HW News Marathi
महाराष्ट्र

मला मंत्रिमंडळात संधी दिली तर मी त्या संधीचं सोनं करेन !

मुंबई | राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होऊन आता जवळपास महिना पूर्ण होत आला असला तरीही अद्याप या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडलेलाच आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये आलेल्या वृत्तानुसार राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार ३० डिसेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, राज्याच्या या मंत्रिमंडळात आता नव्या तरुण चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. या तरुण नेतृत्त्वासाठी आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. “मला मंत्रिमंडळात संधी दिली तर मी त्या संधीचं सोनं करेन”, असे म्हणत रोहित पवार यांनी देखील या चर्चांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे.

“मला मंत्रिमंडळात संधी मिळाल्यास मी त्याचं सोनं करेन. मला मंत्रिमंडळात संधी द्यायची की नाही, हा निर्णय पक्षाचा आहे. मात्र संधी मिळाली तर मी त्याचं सोनं करेन”, अशी प्रतिक्रिया आता रोहित पवार यांनी दिली आहे. “जे काम करतात त्यांना संधी मिळायला हवी, अशी लोकांची इच्छा असते. बोलणारे तर बोलतच असतात. मी कसलीही अपेक्षा न ठेवता काम करत आहे. पक्षाकडून माझ्यावर मंत्रिपदासारखी जबाबदारी सोपविली तर मला ती स्वीकारावी लागेल”, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील कामांचे आयोजन करण्यासाठी घेतलेल्या बैठकीनंतर बोलताना रोहित पवार यांनी आपली हि इच्छा बोलून दाखवली आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेस-राष्ट्रावादीतून अनेक बडे नेते भाजपमध्ये गेल्यानंतर या दोन्ही पक्षांनी नव्याने पक्षबांधणीला सुरुवात केली होती. यावेळी, नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल असे आश्वासन या दोन्ही पक्षांकडून देण्यात आले होते. त्याचप्रमाणे, आता राज्याच्या मंत्रिमंडळात देखील नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा आहे. मात्र, प्रत्यक्षात राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार कसा होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धक्कादायक! परळीत वृद्ध बहिण-भावाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

News Desk

दिलासादायक बातमी ! आज मुंबईत ७७ नवे रुग्ण, कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

News Desk

खोटी माहिती पसरविल्याबद्धल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा, सुधीर मुनगंटीवारांची मागणी

swarit