HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीने निवडणुकीत आम्हांला मदत केली तर हरकत काय? थोरातांचं सेनेला प्रत्युत्तर!

मुंबई | शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून आज (२७ ऑगस्ट) कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांवर निशाणा साधण्यात आला. संजय राऊतांनी कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली असता बाळासाहेब थोरात यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.“काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यामुळे मदत केल्यास हरकत काय?” असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विचारला आहे. साताऱ्यात निवडून यायला पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांची मदत घ्यावी लागते, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले होते. “काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने विधानसभा निवडणूक लढवली होती. एकमेकांच्या ताकदीने आम्ही जिंकलो, हे राष्ट्रवादीही मान्य करते. त्यामुळे मदत होत असेल, हे नक्की. तर त्यात हरकत काय?” असा प्रतिप्रश्न बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

काय म्हटले होते अग्रलेखात ?

तसेच पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा यांच्याविषयी आम्ही जास्त काय बोलावे? साताऱ्यात निवडून येण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांची मदत घ्यावी लागते. या सर्व मंडळींनी सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाला सक्रिय अध्यक्ष हवा, अशी मागणी केल्याची मोठी गंमत वाटते. मुळात पक्षाला सक्रिय करण्यासाठी या नेत्यांना कोणी रोखले आहे? ७० वर्षाच्या सोनिया गांधी यांनी पक्षांतर्गत संगीत खुर्ची, खो-खो, हुतूतू, आटपाट्यांचे सामने भरवून सक्रियता दाखवावी, असे या मंडळींना वाटते काय, असा सवालही शिवसेनेने काँग्रेसमधील ज्येष्ठांना विचारला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

Aprna

किटकांचे नियंत्रण करण्यासाठी स्वतंत्र प्रोटोकॉल तयार करण्याचा निर्णय! – राधाकृष्ण विखे पाटील

Aprna

नागपूरवाले मला मध्येच म्यूट का करतायत? मुख्यमंत्र्यांचा मिश्किल सवाल

News Desk