HW News Marathi
महाराष्ट्र

“पंकजा मुंडेंनी मला मेळाव्याला बोलावलं नाही तर…”- महादेव जानकर

भाजप नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या भगवानभक्ती गडावरील दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. काहीच वेळामध्ये पंकजा यांच्या या मेळाव्याला सुरुवात होईल. यावेळी पंकजा मुंडेंच्या निशाण्यावर कोण असेल? त्या नेमकी काय भूमिका मांडणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून यासाठीची तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर, आज (१५ ऑक्टोबर) रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. “भगवान भक्तीगडावरील मेळाव्याला मला बोलावलं नाही तर मी श्रोत्यांमध्ये जाऊन बसेल. पण मी येणारच”, असं महादेव जानकर म्हणाले.

“पंकजा मुंडे यांच्या पाठीशी कोणी असो वा नसो पण एक भाऊ म्हणून मी त्यांच्या पाठीशी सदैव उभा राहीन. पंकजा मुंडे या भगवान गडावरील दसरा मेळाव्याच्या क्रियेटर आहेत. त्यांनी बोलावलं नाही तर मी मेळाव्याला येणार. श्रोत्यांमध्ये जाऊन बसेन पण हा दसरा मेळावा चुकवणार नाही”, असं महादेव जानकर म्हणाले. दरम्यान, यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना अत्यंत भावनिक आवाहन केलं होतं. जनतेने या मेळाव्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं”, असं आवाहन पंकजांनी केलं होतं.आजची गर्दी पाहता निश्चितच पंकजांच्या या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळालेला दिसतो आहे.

पंकजा मुंडे नाराज नाहीत!

गेल्या दीड वर्षात पंकजा मुंडे अनेक कारणांमुळे नाराज असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात रंगल्या. यावर देखील महादेव जानकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “बहीण एखाद्या गोष्टीमुळे अस्वस्थ असेल तर ती भावाला बोलून दाखवते. पण पंकजाताईंनी मला असं काहीही सांगितलेलं नाही. त्यामुळे कशाहीमुळे त्या नाराज आहेत असं मला वाटत नाही”, असं जानकर म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सरकारकडून कांद्याला प्रति क्विंटलमागे २०० रुपये अनुदान जाहीर

News Desk

नितेश राणेंसह १८ कार्यकर्त्यांना २३ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

News Desk

मुख्यमंत्र्यांसोबत कोणत्या विषयांवर चर्चा झाली?, खुद्द पवारांनीच दिलं उत्तर

News Desk