HW News Marathi
महाराष्ट्र

वेळ आली तर शिवसेना भवन फोडू – भाजप आमदार प्रसाद लाड

मुंबई। भाजपच्या वतीने आज माहिम विधानसभा मतदार संघाच्या कार्यालयाबाहेर पक्षाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला . यावेळी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी एक वादग्रस्त विधान केलं . आम्ही माहिममध्ये आल्यावर शिवसेना भवन फोडण्याची भीती वाटते . घाबरू नका , वेळ आली तर सेनाभवन फोडू , ‘ असं प्रसाद लाड म्हणाले . त्यामुळे आता प्रसाद लाड यांच्या वादग्रस्त विधानामुळे शिवसेना आणि भाजपमधील वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे.

प्रसाद लाड काय म्हणाले ?

प्रसाद लाड म्हणाले की, भारतीय जनता पक्षाची ताकद काय आहे, हे आपण २०१४ निवडणुकीत त्यांना दाखवून दिलं होत. कारण त्यावेळेला जे भाजप होते आणि भाजपला मानणारा जो कार्यकर्ता विचाराचा जो मतदार होता, तो मतदार आज देखील भाजपसोबत आहे. आतातर सोने पे सुहागा हुआ है. कारण राणे कुटुंबियांना मानणारा देखील स्वाभिमान पक्षाचा खूप मोठा गट आज राणेंच्या निमित्ताने भाजपमध्ये आला आहे. त्यामुळे भाजपची ताकद निश्चितपणे दुप्पट झाली आहे. त्यामुळे पुढच्या वेळेला कार्यकर्ते नितेश राणे कमीच आणू. कारण आपण आलो की पोलीस खूप येतात . फक्त त्यांना सांगूया, ट्रेसमध्ये पाठवू नका, जेणेकरून आपल्या हॉलमध्ये बसायला उपयोग होईल, कारण तुमची , आमची एवढी भिती की , यांना असं वाटतं , आता हे माहिममध्ये आले म्हणजे हे सेनाभवन फोडणारचं, काही घाबरू नका , वेळ आली तर ते देखील करू.

आताचं शिवसेना भवन हे कलेक्शन सेंटर

मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहिलेलं नाही. मुंबई ही आमचीही आहे. त्यामुळे शिवसेना भवनसमोर कार्यालय उघडलं असेल तर बिघडलं कुठं?, असा सवाल करतानाच बाळासाहेबांचं शिवसेना भवन आता राहिलं नाही. आताचं शिवसेना भवन हे कलेक्शन सेंटर आहे, अशी घणाघाती टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी देखिल केली.

शिवसेनेवर जोरदार हल्ला

माहीममध्ये राजा बढे चौकात भाजपच्या कार्यालयाचं उद्घटान करण्यात आलं. यावेळी नितेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहिलेलं नाही. मुंबई ही आमचीही आहे. आम्ही आमच्या निवडणुकीची तयारी असो कि कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम असो त्यासाठीची आमची ही तयारी आहे. मुंबईच्या सर्व वॉर्डात भाजपची ताकद वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं नितेश राणे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मतदार ‘बिघाडी’च्या उमेदवाराला घरी बसविल्याशिवाय राहणार नाहीत | पंकजा मुंडे

News Desk

केंद्र आणि राज्य असा भेदभाव योग्य नाही – रोहित पवार

News Desk

शिवसेना नेत्यांकडून जीवाला धोका, मुंबईतील खटले हिमाचलला हलवा, कंगना राणावतची मागणी

News Desk