HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात तिसरी लाट आली तर…!

मुंबई | राज्यात तिसरी लाट आली तर ती ओमायक्रॉनची असेल, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेतून स्पष्टपणे सांगितले आहे. युरोप, अमेरिका आणि फ्रान्समध्ये या देशात ओमायक्रॉनचा प्रसार हा वेगाने होत आहे. त्यामुळे राज्यात खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसे केले नाही तर रुग्णांच्या सख्येत वाढ होण्याची शक्यता  राजेश टोपे आज (२५ डिसेंबर) पत्रकार परिषदेतून सांगितले आहे. ओमायक्रॉनमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे. पण आपण काळजी घेणे गरजेचे आहे. यामुळे सर्वानी नव वर्षाचे स्वागत करा, परंतु नियम पाळून स्वागत करा, अशी विनंती आरोग्यमंत्र्यांनी केली आहे. 

ओमायक्रॉनचा संसर्ग वाढण्याचा वेग हा दुप्पट आहे. हे आपण लक्ष्यात घेतले आहे. राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण संख्या १०८ वर येवून पोहचली आहे. यावरून आपण ओमायक्रॉनचा वेग लक्षात घेऊ शकतो. राज्यात तिसरी लाट आली तर ती ओमायक्रॉनची असल्याची शक्यता टोपेंनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केली आहे. तसेच राज्यात ख्रिसमस आणि नववर्ष स्वागताचा काळात मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन केले जाते. त्यामुळे राज्यात निर्बंध लावण्यात आले आहे. या निर्बंधांचा कोणताही चुकीचा अर्थ कुणी काढू नका, असेही ते यावेळी म्हणाले. 

राज्यातील ऑक्सजिन ८०० मॅट्रीक टन लागेल त्या दिवशी लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असे ही राजेश टोपे म्हणाले. जर राज्यात कोरोनाचा संसर्गचा वेग अधिक असेल तर ऑफ्सिजनची ८०० मॅट्रीक टनाची आवश्यकता ५०० मॅट्रीक टनवर आणावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील शाळासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “शाळासंदर्भात तुर्तास तरी सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही, असेही आरोपग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे राज्यात ज्या शाळा सुरू आहेत, तशाच त्या सुरू राहतील, असे त्यांनी सांगितले. आणि लहान मुलांच्या लसीकरणबाबत सरकार प्रयत्नशील आहेत, ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवीन अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे धडे समाविष्ट करण्याचा निर्णय घेणार! – चंद्रकांत पाटील

Aprna

अतिवृष्टीने नुकसानग्रस्त पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत!  – अब्दुल सत्तार 

Aprna

पुणे बेंगलोर महामार्गावर अपघात, १७ जणांचा मृत्यू, २० जखमी

News Desk