HW News Marathi
महाराष्ट्र

ST कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरण करण्यात अडचण काय? चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना सवाल

मुंबई | एसटीचे विलिनीकरण होईल, असे डोक्यातून काढून टाका, असे स्पष्ट मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात व्यक्त केले आहे. उपमुख्यमंत्र्याच्या वक्तव्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे विलनीकरण करण्यात अडचण काय आहे. राज्याची तिजोरी आहे, कशासाठी हे मला कळतचे नाही, असा सवाल उपमुख्यंत्र्यांना केला आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यापासून ते संपावर गेले आहेत. या संपावर तोडगा काढण्यासाठी सरकारने त्यांच्या पगारात वाढ केली. परंतु तरी देखील कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर कायम आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरण येत्या ५ जानेवारीला सुनावणी होणार आहे. गेल्या आठवड्यात कनिष्ठ वेतनश्रेणी कामगार संघटनेच्या नेत्यांनी संप माघारी घेत असल्याची घोषणाही केली होती.

चंद्रकांत पाटील नेमके काय म्हणाले

एसटी कर्मचाऱ्यांचे विलनीकरण करण्यात अडचण काय आहे. राज्याची तिजोरी आहे कशासाठी हे मला कळतचे नाही. भाजपच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा कारभार खूप काटेकोरपणे चालवत होते. एसटीच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ देता येत नाही असे तुम्ही सभागृहात सांगितले. मग, राज्याच्या तिजोरीचे करायचे काय?,” असा सवाल उपस्थित करत अजित पवारांवर पाटलांनी टीका केली.

अजित पवार सभागृहात नेमेक काय म्हणाले

अजित पवार, “एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीचा चेंडू हा आता हायकोर्टात असून हायकोर्टाच्या निर्देशावरून विलीनीकरणाची तपासणी करण्यासाठी त्रिसदस्यी समिती स्थापन केली आहे. या समितीने अभ्यासासाठी मुदत वाढ मागितली असल्याची माहिती अजित पवारांनी काल (२४ डिसेंबर) सभागृहात सांगितले. हा अहवाल येईपर्यंत एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहेत. त्यामुळे एसटीचे विलिनीकरण होईल, असे डोक्यातून काढून टाका.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या ताटातील उरलेले खरकटे खाऊन शिवसेना पोट भरतेय!

News Desk

‘सारथी’ संस्थेला स्वायत्तता देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

News Desk

महाविकासआघाडी सरकार माझ्यावर पाळत ठेवतयं, संभाजीराजे छत्रपतींचा गंभीर आरोप!

News Desk