HW News Marathi
महाराष्ट्र

आज बाळासाहेब असते, तर… क्रांती रेडकरचं मुख्यमंत्री ठाकरेंना भावनिक पत्र

मुंबई। एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्यावर विविध केले जात असून, त्यांच्या जात प्रमाणपत्राबद्दलही शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणात आता समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरही आरोपांना प्रत्युत्तर देताना दिसत आहे. नवाब मलिकांकडून केल्या जात असलेल्या आरोपांवरून क्रांती रेडकरने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भावनिक पत्र लिहिलं आहे.

क्रांती पत्रातून नेमकं काय म्हणाली?

”मी लहानपणापासून मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झाली आहे. मी एक मराठी मुलगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊनच मी वाढले आहे. कुणावर अन्याय करू नये आणि आपल्यावर होणारा अन्याय सहन तर मुळीच करू नये हे दोघांनी शिकविलं. तोच धडा गिरवत आज मी एकटी माझ्या खासगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरोधात ठामपणे उभी आहे. लढते आहे. सोशल मीडिया आणि त्यावरच लोक फक्त मजा बघतात. मी एक कलाकार आहे. राजकारण मला कळत नाही आणि मला त्यात पडायचं देखील नाही. आमचा काहीही संबंध नसताना रोज सकाळी आमच्या अब्रूची लत्करं चार-चौघांत उधळली जातात. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या गरिमेचा खेळ करून ठेवला आहे. विनोद करून ठेवला आहे.”

मी एक कलाकार आहे. राजनीती मला कळत नाही आणि मला त्यात पडायचं सुद्धा नाही. आमचा काहीही संबंध नसताना रोज सकाळी आमच्या अब्रुची लख्तरं चारचौघात उधळली जात आहेत. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या गरिमेचा खेळ करुन ठेवला आहे. विनोद करुन ठेवला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिंगणघाट जळीत कांड : न्यायालयात पीडितेची बाजू वकील उज्जवल निकम मांडणार

swarit

मनसेच्या आपत्ती व्यवस्थापनाची राज ठाकरेंकडून घोषणा, कसं असेल पथक?

News Desk

चौकशीत बाधा येऊ नये म्हणून आयुक्तांची बदली केली – गृहमंत्री

News Desk