HW News Marathi
महाराष्ट्र

सगळं बोललो तर परवडणार नाही नारायण राणे!

रत्नागिरी। मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला इशारा दिला आहे. दोन दिवस खंड पडल्यानंतर आता पुन्हा एकदा राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली आहे. त्यावेळी रत्नागिरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर वक्तव्य केले होते, त्यानंतर सुशांतसिह राजपूतची हत्या आणि दिशा सालियानची बलात्कार करुन हत्या झाली. त्याचे आरोपी मिळाले नाही. नारायण राणेच्या पाठीमागे लागू नका. नाहीतर मी आता थोडं बोलतोय. नाहीतर सगळं बोलावं लागेल ते परवडणारं नाही, अशा शब्दात राणेंनी शिवसेनेला एकप्रकारे दम भरलाय.

आम्ही काही कायम विरोधी पक्षात राहण्यासाठी आलो नाही

मी कुठलाही गुन्हा केला नाही. आपण सत्तेत आहोत, ती सत्तेची मस्ती दाखवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. काही हरकत नाही. आम्ही काही कायम विरोधी पक्षात राहण्यासाठी आलो नाही. भविष्यात आम्हीही सत्तेत येऊ. त्यामुळे अधिकारी, पोलिसांनी कायद्यात राहून काम करावं. कायद्याच्या बाहेर जाऊन काम कराल तर तुम्हाला कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशारा राणेंनी अधिकारी आणि पोलिसांना दिला आहे. जर मी क्रिमिनल होतो तर मुख्यमंत्री कसं केलं? इतके दिवस मंत्री कसा राहिलो? असा सवालही राणेंनी विरोधकांना केलाय. आता मोदींच्या काळात केंद्रीय मंत्री झालो. पण पहिली पदं यांनीच दिली ना. तेव्हा नव्हतं का कुणी विरोध करायला? असंही राणे म्हणालेत. साहेबांना जेव्हा दहशतवाद्यांकडून धोका होता, तेव्हा त्यांना मातोश्री सोडायला सांगितलं तेव्हा साहेबांनी सुपुत्राला सोबत घेतलं नाही, असा टोला राणेंनी लगावलाय.

कोरोनाची बंधनं फक्त नारायण राणेंसाठीच आहेत का?

कोरोना काळात महाराष्ट्रात 1 लाख 57 हजार नागरिकांचा मृत्यू झाला. देशात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. कोरोनाची बंधनं फक्त नारायण राणेंसाठीच आहेत का? आमच्या देशात आम्ही राहतो. तेव्हा आम्हाला आमच्या देशात अशी मनाई का? कोरोना मोठ्या प्रमाणात होता तेव्हा अशी कुठलीही कारवाई झाली नाही, असा आरोपही राणेंनी केलाय. माझ्या घराजवळ आलेल्या चिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला. पोलिसांनी त्यांना चांगलंच चोपलं, असा टोलाही राणी लगावला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“घरात राहायला तुम्ही सांगत होता मग तुम्हीच…”,भाजप प्रवक्त्या मोदींवर भडकल्या

News Desk

बुलडाण्यात ३ जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत वाढ

News Desk

परळीत जनतेकडून सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा

News Desk