HW News Marathi
महाराष्ट्र

नवमतदारांनो ! मतदानाला जाताना ‘हे’ नक्की वाचा

मुंबई | राज्याची आज (२१ ऑक्टोबर) १४वी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. एक लोकशाहीवादी देश असल्याने भारतात निवडणुकांना मोठे महत्त्व आहे. मतदानाचा हक्क बजावण्याची सर्वात मोठी जबाबदारी नागरिकांची आहे. मतदानाच्या वेळी मतदारांनी कोणकोणती काळजी घ्यावी. यावेळी मतदारांना ओळखपत्र सादर करणे बंधनकारक असते. मात्र, निवडणूक आयोगाने मतदान ओळखपत्र नसलेल्या मतदारांसाठी काही पर्याय दिले आहे. त्यामुळे मतदान ओळखपत्र नसले तरी त्यांना त्यांचा मतदानाचा अधिकार बजावता येणार आहे.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात पहिली निडवणूक २५ ऑक्टोबर १९५१ ते २७ मार्च १९५२ दरम्यान झाली. यावेळी निवडणुकीकरिता बॅलेटबॉक्सचा वापर केला जात होता. ज्यात एका विशेष कागदावर आपल्या उमेदवाराच्या निवडणूक चिन्हावर निशाण लावून आपले मत नोंदवावे लागत असे. मात्र, हळूहळू या प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी, समस्यांमुळे भारतीय निवडणूक आयोगाने मतदानासाठी ईव्हीएमचा वापर सुरु झाला.  भारतात पूर्वी मतदानाकरिता बॅलेटबॉक्सचा वापर केला जात होता. मात्र,आता ईव्हीएमचा वापर केला जातो. भारत अशा काही मोजक्या देशांपैकी एक आहे. जिथे ईव्हीएमचा वापर केला जातो. इतकेच नव्हे तर अमेरिकेत अजूनपर्यंत बॅलेटबॉक्सचाच वापर केला जातो.

याशिवाय, मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही?, हे पाहणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही. मतदार यादी तुम्ही घरबसल्याही तपासू शकता. यासाठी निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.in या वेबसाईटवर मतदान केंद्राबद्दल एका क्लिकवर माहिती मिळू शकेल. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी २१ तारखेला संपूर्ण राज्यात इलेक्ट्रॉनिक यंत्राद्वारे मतदान होणार आहे. २८८ जागांसाठी होणाऱ्या या मतदानासाठी १ लाख ७९ हजार ८९५ मतदान यंत्र (बॅलेट युनिट) आणि १ लाख २६ हजार ५०५ नियंत्रण युनिट सज्ज करण्यात आली आहेत. शिवाय, १ लाख ३५ हजार २१ VVPAT (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्रे पुरवण्यात आली आहेत.

जर आपण नवमतदार आहेत तर जाणून घ्या

  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्यासोबत तुमच्या ओळखीचा पुरावा म्हणून (ओळखपत्र म्हणून) तुमचे वोटर आयडी नेणे महत्त्वाचे आहे.
  • जर कोणत्याही कारणास्तव तुमच्याकडे तुमचा वोटर आयडी नसेल मतदानावेळी मतदानकेंद्राबाहेर एक स्वयंसेवक मतदारांच्या मतदीसाठी उपस्थित असतो. तो तुम्हाला त्यांच्याकडे असलेल्या यादीत तुमचे नाव शोधून एक रिसीट (ओळखपत्र) देतात.
  • जर कोणत्याही कारणास्तव आपले वोटर आयडी हरवले असेल तर तुम्ही तुमच्यासोबत कोणतेही वेगळे ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट किंवा अन्य कोणतेही सरकारमान्य ओळखपत्र सोबत ठेऊ शकता.
  • मतदानकेंद्रावर पोहोचल्यानंतर मतदाता सूची दाखवून तुम्ही आपली चिट्ठी घ्यायची. आणि पुढे जाऊन मतदान करायचे आहे.
  • जेव्हा तुम्ही मतदान करायला जाल तेव्हा तिथे उपस्थित अधिकारी तुमच्या बोटाला शाई लावेल. त्यानंतर तुम्हाला तिथे २ ईव्हीएम मशिन्स दिसतील. मात्र, दोन्ही मशिन्सचा कंट्रोल पॅनल एकच असेल. याचे कारण असे की, एका मशीनमध्ये केवळ १६ उमेदवारांचीच नावे समाविष्ट असू शकतात. प्रत्येक ईव्हीएममशीनवर उमेदवार आणि त्यांचे निवडणूक चिन्ह छापलेले असते. आणि प्रत्येक निवडणूक चिन्हासमोर एक निळे बटण असते.
  • ज्या उमेदवाराला तुम्हाला मतदान करायचे आहे त्याच्या निवडणूक चिन्हापुढचे निळे बटण दाबून तुम्ही तुमचे मत नोंदवू शकता. हे बटण दाबल्यावर बिपचा मोठा आवाज येईल. या आवाजाचा अर्थ तुमचे मत नोंदविले गेले आहे.
  • मतदान प्रक्रिया संपल्यानंतर तेथील उपस्थित अधिकारी एव्हीएम मशीनवरील क्लोजचे बटण दाबतात. त्यानंतर कोणाचेही मत नोंदविले जाऊ शकत नाही. त्याच ईव्हीएममशीनमध्ये एक चिप असते जी तुमचे सर्व रेकॉर्डस् एकत्र करते.
  • विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. त्यामुळे एक जबाबदार नागरिक म्हणून मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांना ओळखपत्र सादर करणे बंधनकारक आहे. यासाठी मतदारांकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेले मतदान ओळखपत्र नसेल तर काही हरकत नाही. मात्र, यासाठी पासपोर्ट, पॅनकार्ड अशी खालील दिलेली आवश्यक ओळखपत्र मतदानासाठी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे या ग्राह्य ओळखपत्रांच्या आधारे मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दानवेंच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या मदतीला पवारांचा हात

Adil

आरक्षण द्या नाही तर पुन्हा आंदोलन पेटणार

swarit

जलसा, प्रतिक्षा, रामायण हे फिल्मसिटीचं वैभव, हे वैभव सुद्धा तिकडे घेऊन जाणार आहात का? राऊतांचा योगींना सवाल 

News Desk