HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेच्या आमदारांची आज तातडीची बैठक

मुंबई। राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवसेना मुख्यमंत्री पदावर हटून बसली आहे. शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपने आता काहीशी नरमाईची भूमिका घेतली आहे, मात्र, शिवसेनेला मुख्यमंत्रिपद न देण्यावर भाजप ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (७ नोव्हेंबर) शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली आहे. शिवसेना पक्षप्रमुखांच्या मातोश्री निवासस्थानी सकाळी ११.३० वाजता बैठक होणार आहे.

दरम्यान, विरोधी पक्षाच्या बाकावर बसणार असे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (६नोव्हेंबर ) घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच या बैठकीत राज्यामध्ये सध्या निर्माण झालेला सत्ता स्थापनेचा तिढा, भाजपसोबत वाटाघाटी करण्याबाबत आमदारांची भूमिका, भाजपबाबत शिवसेना आमदारांचे असलेले मत याबाबत चर्चा होणार आहे.

काँग्रेस नेते हुसेन दलवाईंनी संजय राऊतांची भेट घेतली असून, त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत भाजपवर निशाणा साधला. कोणत्याही परिस्थितीत भाजपचे सरकार अन् मुख्यमंत्री होऊ देणार नाही. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू देणार आहे. शरद पवार आणि सोनिया गांधींनी मिळून यावर तोडगा काढावा. भाजपपेक्षा शिवसेना केव्हाही चांगलीच आहे. देवेंद्र फडणवीस यांना भागवतांचा सल्ला घ्यावा लागतो, असे म्हणत दलवाईंनी भाजपवर टीका केली आहे.

Related posts

मराठा आरक्षण आंदोलनातील सर्व गुन्हे मागे, राज्य सरकारचा मोठा निर्णय

News Desk

प्रताप सरनाईकांशी संबंधित NSEL प्रकरणी ईडीला हायकोर्टाचा दणका!

News Desk

मुंबई महानगराचा संपूर्ण कायापालट करणार! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna