HW News Marathi
Covid-19

केंद्राकडून देण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्सचे तत्काळ ऑडिट करा ! पंतप्रधानांचे आदेश

नवी दिल्ली । देशातील अत्यंत आव्हानात्मक कोरोनास्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलवली होती. शनिवारी झालेल्या (१५ मे) या बैठकीत देशातील कोरोनास्थिती, तसेच लसीकरण कार्यक्रम, ऑक्सिजनची उपलब्धता याबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी, “केंद्र सरकारकडून देण्यात येत असलेल्या व्हेंटिलेटर्सच्या वापराचे तत्काळ ऑडिट करा”, असे आदेश पंतप्रधान मोदींनी दिले आहेत.

केंद्राकडून देण्यात आलेले व्हेंटिलेटर्सचा अनेक राज्य सरकारांकडून वापरचच होत नसल्याचे समोर आले आहे. याबाबत नाराजी व्यक्त करत पंतप्रधान मोदींनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. त्याचसोबत, “केंद्र सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्सच्या वापराचे तत्काळ ऑडिट करा”, असे आदेशही पंतप्रधान मोदींनी आता दिले आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी याचसोबत घरोघरी जाऊन कोरोनाच्या चाचण्या करण्याची तसेच ग्रामीण भागात आरोग्य सेवेच्या साधनांत वाढ करण्याची आवश्यकता देखील व्यक्त केली आहे.

यावेळी बैठकीदरम्यान, ‘अनेक राज्यांत चाचण्यांची संख्या वाढवण्यात आल्याचे’ अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना सांगितले आहे. ग्रामीण भागात ऑक्सिजन पुरवठ्यासाठी योग्य वितरण सुनिश्चित करण्याबाबतही पंतप्रधान मोदींनी सूचना दिल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात ६५ लाख ५५ हजार ४८० क्विंटल अन्नधान्याचे वाटप, छगन भुजबळ यांची माहिती

News Desk

सोशीअल डिस्टसिंगचे पालन करत के.ई.एम. रुग्णालयातील सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन

News Desk

कच्च्या तेलाच्या कमी झालेल्या किंमतींचा फायदा नागरिकांना मिळवा, सोनिया गांधीपाठोपाठ थोरातांनी केली मागणी

News Desk