HW News Marathi
देश / विदेश

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा ! नारायण राणेंची अमित शहांकडे पत्राद्वारे मागणी 

मुंबई | पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण ते मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण यावरून गेल्या काही दिवसांत भाजपने महाविकासआघाडीची पुरती कोंडी केली आहे. एकामागोमाग एक आव्हाने देत भाजप ठाकरे सरकारला अडचणीत आणत आहे. याच पार्श्वभूमीवर, भाजप नेते आणि शिवसेनेचे कट्टर शत्रू असलेले नारायण देखील पुढे सरसावले आहेत. “महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था संपूर्णपणे ढासळली आहे. राज्यात जनता सुरक्षित नाही. महाराष्ट्र सरकार राज्य सांभाळण्यास सक्षम नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी”, अशी मागणी नारायण राणे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. दिल्लीत ३ दिवसांपूर्वीच अमित शहा यांना पत्र लिहून आपण ही मागणी केल्याची माहिती नारायण राणे यांनी दिली आहे.

“वाझेंचा गॉडफादर कोण आहे ?”

नारायण राणे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले कि, “अंबानी स्फोटक प्रकरणात पोलिसांचा वैयक्तिक कारणांसाठी वापर केला जात आहे. कोणाला तरी वाचवण्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. कोणाला कधी काय होईल याची काही शाश्वती राहिली नाही. विकास नाही आणि पण भ्रष्टाचार वाढला आहे. त्यामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी मी अमित शहा यांच्याकडे केली आहे”, असे नारायण राणे यांनी स्पष्ट केले आहे.

“वाझेंची पोलीस दलात पोस्टिंग कोणी केली. दिशा सालियन प्रकरणातही वाझेंकडे पोस्टिंग कोणी दिली. पोलिस दलात वाझेंचा गॉडफादर कोण आहे? वाझेंना कोण वाचवत? याचीही चौकशी व्हावी” अशी मागणी राणेंनी केली आहे.त्याचप्रमाणे, “वाझेंना शिवसेनेचा आश्रय आहे. म्हणूनच बेकायदेशीर कामे सुरू आहेत. वाझेंच्या जीवावरच शिवसेनेकडून लोकांना धमक्या दिल्या जात आहेत. वाझे आणि शिवसेना नेत्यांचे संबंध आहेत”, असे गंभीर आरोपही केले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जेष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन

News Desk

अजित पवारांच्या निकटवर्तीयावर ED कारवाई, साखर कारखान्यावर जप्ती

News Desk

अनिल देशमुखांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांना ED कडून अटक

News Desk