HW News Marathi
देश / विदेश

#Goodbye2019 : देशासह राज्यातील ‘या’ वर्षातील महत्त्वाच्या घडामोडी

मुंबई | नव्या वर्षात पदार्पण करण्यासाठी अवघ्या काही तास शिल्लक राहिले आहे. २०१९ या सरत्या वर्षाला बायबाय करण्यासाठी संपूर्ण देशभरात ठिकठिकाणी अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे. २०१९ हे राजकीय वर्षे देशासाठी खूप महत्त्वाचे ठरले आहे. २०१९मध्ये देशात बालाकोट एअर स्ट्राईक, लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना मोठे यश मिळाले. तर राहुल गांधींना अपयशाला सामोरे जावे लागल्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वात मोदींनी जम्मू-काश्मीर मधील कलम ३७० रद्द केले. यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला बहुमत असून देखील मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये सत्ता संघर्ष निर्णामा झाला. यानंतर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांची महाविकासआघाडी असे वेगळे सत्ता समीकरण राज्यात पाहायला मिळाले. संपर्ण देशाला हदरविलेले महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष वर्षभरात घडलेल्या मोठ्या घडामोडींकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते.

बालाकोट एअर स्ट्राईक

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा परिसरात १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने भारतीय जवानांच्या बसेसच्या ताफ्यावर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. या भ्याड हल्लानंतर भारतीय वायुसेनेने २६फेब्रुवारी रोजी भारत-पाक सीमेलगत पाकिस्तानच्या हद्दीत असलेल्या बालाकोट इथल्या तळावर हल्ला केल्याचा दावा केला. यात २५० पेक्षा अधिक दहशतवादी मारले गेल्याचा दावा सरकारने केला होता. विशेष म्हणजे भारताने पाकिस्तानात घुसून केलेल्या एअरस्ट्राईकनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता वाढल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले होते.

लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचे यश

मे महिन्यामध्ये लोकसभेची निवडणूक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ३०३ जागा मिळवून बहुमत मिळवले. प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसला ५२ जागा मिळवता आल्या. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मोदींना कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात राहुल गांधीला अपयश आले. निकालानंतर काँग्रेसला अपयशानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.

कलम ३७० रद्द

भारताच्या इतिहासातील कलम ३७० हा अतिशय महत्त्वाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या पर्वातील सर्वा मोठा निर्णय मानला जातो. हे कलम रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतला आणि त्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले. लडाख हा विधीमंडळाशिवायचा केंद्रशासित प्रदेश आला आहे, तर जम्मू-काश्मीर विधीमंडळासह केंद्रशासित प्रदेश करण्यात आले. या महिन्यात काश्मीरमध्ये संचारबंदी, इंटरनेटवर ब्लॅकआऊट अशा अनेक गोष्टी घडल्या. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्याच्या निर्णयावर पाकिस्तानने भारताचा कडाडून विरोध केला. पाकिस्ताने भारताच्या या निर्णयाविरोधात संयुक्त राष्ट्रसंघात आवाज उटविला होता. मात्र, संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानला अपयश आले. या निर्णयामुळे एखादा नवा कायदा लागू करायला केंद्राला राज्य सरकारच्या परवानगीची आवश्यकता नसून, राज्याच्या कायद्यात केंद्र सरकार हस्तक्षेप करु शकणार आहे. तसेच 370 कलम हटवल्याने संपत्ती खरेदीचा आणि गुंतवणुकीचा मार्गही मोकळा झाला आहे.

महाराष्ट्राला दुष्काळ आणि पुराने झोडपले

महाराष्ट्राने २०१९ या एकाच वर्षात दुष्काळ आणि पुराने झोडपले. उन्हाळ्याचा दाह पाणीटंचाई आणि त्यापाठोपाठ आलेल्या चाराटंचाईमुळे अधिक तीव्र झाला. पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी अनेक चर्चा झाल्या, बैठका झाल्या. यानंतर ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात पश्चिम महाराष्ट्राला जोरदार पाऊस आणि त्यापाठोपाठ आलेल्या पुराने हवालदिल केले. अनेकांचे सर्वस्व यात वाहून गेले. मोठ्या प्रमाणावर बचावकार्य आणि मदतकार्य सुरू असतानाच प्रत्यक्ष पुराने केलेल्या नुकसानाचा झाले.

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये मेगा भरती

लोकसभा निवडणुकीत भाजपला पंतप्रधान नरेंद्र मोदींना घवघवीत यश मिळाल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करण्याची स्पर्धा पाहायला मिळाली. यात लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार होत्या. या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यात काँग्रेस माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचा मुलगा सुजय विखे पाटील याला आपल्या पक्षात स्वागत करुन नगरमध्ये धक्कातंत्र राबविले. त्याबरोबरच नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रगती पथाला खिंडार लावत नाईक पिता पुत्रांना आपल्या पक्षात स्थान देऊन नवी मुंबई देखील आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न पक्षाकडून करण्यात आला.यात गणेश नाईक, संदीप नाईक आणि त्यांच्यासोबत असलेल्या सर्व नगरसेवकांनी यावेळी भाजपच्या मेगाभरतीत सहभागी झाले. त्याशिवाय सातार्‍यातील राष्ट्रवादीच्या तिकीटावरून लोकसभेत निवडून आलेले उदयनराजे भोसले यांना देखील आपल्या गोटात स्थान देत राष्ट्रवादीला धक्का दिला. तसेच, शिवेंद्रराजे, चित्रा वाघ, मधुकर पिचड, काँग्रेसचे कालिदास कोंळबकर, हर्षवर्धन पाटील यांना पक्षात स्थान देत केलेली मेगाभरती या वर्षी चर्चेचा विषय ठरला.

राज्यातील निवडणुकीत सत्तासंघर्ष आणि महाविकासआघाडी

गेल्या दोन दशकांतली सगळ्यांत नाट्यमय विधानसभा निवडणूक महाराष्ट्राने २०१९ साली पाहिली हाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकालात शिवसेना-भाजपला बहुमत मिळाले होते. मात्र, या दोघांमध्ये मुख्यमंत्री पदावरून सत्ता संघर्ष पाहायला मिळाला. सरकार कोण स्थापन करणार आणि ते कधी करणार याबद्दल कुठलीच स्पष्टता येत नसताना भाजपच्या गोटातून बराच काळ ‘गोड बातमी’ येण्याचे आश्वासन दिले जात होते. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपकडून बरेच प्रयत्न सुरू होते. मात्र, भाजप सत्ता स्थापन करण्यात अपयश आले.

यानंतर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना असे नवी सत्ता समीकरण उदयास येणार आणि त्याचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार असल्याचे निश्चित झाले असा, २३ नोव्हेंबर रोजी राज्यात मोठा राजकीय भूकंप घडला. भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या मदतीने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण ८० तासांच्या आतचे अजित पवारांनी राजीनामा दिला आणि सर्वांना धक्का दिला. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार आले नुकताच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून यामध्ये ३६ मंत्र्यांना स्थान देण्यात आले आहे.

 

Related posts

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जतनंतर महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यावर केला दावा

Aprna

पॉर्न वेड्या नवऱ्याविरोधात पत्नीची सुप्रीम कोर्टात तक्रार

News Desk

काश्मीर प्रातांतील सर्व समस्या सोडवल्या जातील !

News Desk