HW News Marathi
महाराष्ट्र

बॅंक आणि दुकानदारांसाठी अन्न व औषध प्रशासनांची मार्गदर्शक नियमावली

मुंबई | न दिसणाऱ्या कोरोना विषाणूने जगभारात हैदोस घातला आहे. भारतातही ३ मेपर्यत लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. तसेच, नागरिकांचे हाल होणार नाही यासाठी जीवनावश्यक बाबी सुरु ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे दुकानदार, बॅंक कर्नचारी यांनी व्यवहार करताना काय खबरदारी घ्यावी याची मार्गदर्शक तत्वे राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने जारी केली आहे.

काय आहे मार्गदर्शक सूचनांची यादी :

  • बॅंक कर्मचाऱ्यांनी आणि दुकानगारांनी नोटा हाताळल्यानंतर लॅनिटायझरचा वापर करावा.
  • दुकानदारांनी अन्न पदार्थ हाताळल्यानंतर सॅनिटायझरचा वापर करावा.
  • दुकानाच्या बाहेर ग्राहकांनी १ मीटरचे अंतर ठेवून उभे राहावे.
  • दुकान-आस्थापनांमध्ये स्वच्छता राखा.
  • मास्कचा वापर अनिवार्य.
  • ग्राहकांसाठी वेगळे सॅनिटायझर ठेवा.
  • अन्नपदार्थ हाताळमाऱ्या व्यक्तींची वैद्यकीय चाचणी करावी.
  • मुदतबाह्य अन्नपदार्थांची विक्री करु नका.
  • या कालाधीत फक्त परवानाधारक- नोंदणीकृत अन्न व्यावसायिकांकडूनच अन्न पदार्थ खरेदी करा.
  • या सूचनांचे पालन न केल्यास अन्न व औषझ प्रशासन विभागाच्या वतीने कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाड शहरातील नुकसानग्रस्त दुकानदारांना मदतीसाठी शॉपॲक्ट परवाना नसल्यास इतर पुरावेही ग्राह्य धरणार

News Desk

पुण्यात कर्जबाजारी दाम्पत्याची आत्महत्या

swarit

या दिग्गजांनी चुकवला वाहतुकीचा दंड

News Desk