HW News Marathi
महाराष्ट्र

माझी बॅट, माझा बॉल म्हणून चिडून बॅट-बॉल घेवून जायचा, ‘ईडी’च प्रकरण चालू !

मुंबई | महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत (एमएससी बँक) घोटाळ्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह ७० नेत्यांवर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पवारांचा नातू रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहून भाजप आणि ईडीवर टीका केली आहे. “माझी बॅट, माझा बॉल म्हणून चिडून बॅट-बॉल घेवून जायचा. तसच हे ईडीच प्रकरण चालू असल्याचा संशय येतो. चांगल खेळता येत नसले की काहीही करून चिडायचे.” असे रोहित पवार म्हणत ईडी आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. “फक्त एक गोष्ट लक्षात असूदे आपला गडी लय भारी आहे.” रोहित पवारांनी असा विश्वास फेसबुक पोस्टमध्ये लिहिला आहे.

भाजप सरकार सूडबुद्धीने शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी याविरोधात आज (२५ सप्टेंबर) बारामती बंदची हाक दिली आहे. राज्य सहकारी बँकेत २५ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) अजित पवारसह ७० बड्या नेत्यांवर २६ ऑगस्टला माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४०९, ४०६, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४९१, १२० (ब) यांसह लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

रोहित पवार यांची नेमकी काय आहे फेसबुक पोस्ट

“लहानपणी क्रिकेट खेळताना एखादा चांगल खेळत असेल तर लगेच एखादा चिडका मुलगा यायचा. माझी बॅट, माझा बॉल म्हणून चिडून बॅट-बॉल घेवून जायचा. तसच हे ईडीच प्रकरण चालू असल्याचा संशय येतो. चांगल खेळता येत नसलं की काहीही करून चिडायचे. फक्त एक गोष्ट लक्षात असूदे आपला गडी लय भारी आहे.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्थसंकल्प विधीमंडळात सादर होण्यापूर्वीच फुटला !

News Desk

पुण्यात कर्जबाजारी दाम्पत्याची आत्महत्या

swarit

नोटीस वॉर…अमृता फडणवीसांची नवाब मलिकांना कायदेशीर नोटीस

News Desk