HW News Marathi
Covid-19

इंदापूर शहरात एकाच दिवसात २ जण कोरोना पॉझिटिव्ह

इंदापूर | महाराष्ट्रात कोरोना विषाणूने थैमान घातले असताना आज एकाच दिवसात इंदापूर शहरामध्ये दोन रुग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ माजली आहे, इंदापूर शहरामध्ये आज (१३ जून) तिसरा रुग्ण आढळून आला आहे यापूर्वी सोलापूरहून आलेल्या ज्येष्ठ नागरिकाला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते त्याचा वर पुणे येथे उपचार सुरू आहेत. त्यानंतर आज सकाळी सात वाजता ३८ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली. यामुळे इंदापूरमध्ये प्रचंड खळबळ उडाली. मात्र असे असतानाचा सायंकाळी ४ वाजता भाजी मंडई परिसरातील एका ४५ वर्षे वयाच्या व्यक्तीला कोरोना ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आणि सध्या या व्यक्तीवर पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

इंदापूर शहरात एकूण 3 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी २ जण आजच्या (१३ जून) एका दिवसात सापडले आहेत. तर इंदापूर तालुक्यात यापूर्वी ५ कोरोनाबाधित सापडले होते. त्यापैकी एकाच मृत्यू झाला, तर ४ जण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. दरम्यान सध्या इंदापूर शहरांत काहीसे तणावपूर्ण वातावरण आहे. मात्र, इंदापूर शहरातील नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व इंदापूरच्या नगराध्यक्ष अंकिता शहा यांनी केले आहे.

इंदापूर शहरातील एका नगरसेविकेच्या पतीला गेल्या दोन दिवसात जास्त त्रास जाणवू लागल्याने. शुक्रवार (१२ जून) रात्री या व्यक्तीला पुढील उपचारासाठी तातडीने पुणे येथे सह्याद्री हॉस्पिटल ला पाठवण्यात आले. तत्पूर्वी इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाने या व्यक्तीच्या घशातील स्रावाचा नमुना घेतला. आणि आता या व्यक्तीची कोरणा चाचणी पॉझिटिव्ह आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. हा व्यक्ती सक्रिय राजकारणात असल्याने शहरातील शेकडोहून अधिक व्यक्तींच्या संपर्कात आल्याची चर्चा आता शहरातून कानी पडत आहे.यामुळे या व्यक्तीच्या संपर्कात नेमक्या किती व्यक्ती आल्या याचा शोध इंदापूर प्रशासन घेत आहे.तात्काळ या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहात कोरंडाटाईन केले जाईल व त्यांचे स्वॅब घेतले जातील अशी प्राथमिक माहिती तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कुणीही प्रत्यक्ष येऊ नका, पुष्पगुच्छ पाठवू नका, गर्दी जमवू नका

News Desk

सेना भवनावर हल्ला करण्याचा भाजपचा डाव होता ! शिवसेनेचा गंभीर आरोप

News Desk

अमित ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्रातून केली ‘ही’ मागणी

News Desk