HW News Marathi
Covid-19

एकट्या मुंबईत आज तब्बल ५ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि प्रशासनाची चिंता दिवसेंदिवस दुप्पट होत आहे. देशात कोरोनाचे सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० शहरांपैकी ९ शहरे ही एकट्या महाराष्ट्रात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून थोड्याच वेळापूर्वी ही माहिती आलेली असताना आता देशाची राजधानी असलेल्या मुंबईतील कोरोनास्थितीबाबतही चिंता वाढवणारा आकडा समोर येत आहे. एकट्या मुंबई शहरात आज (२४ मार्च) अवघ्या २४ तासांत तब्बल ५ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार मुंबईत गेल्या २४ तासांत तब्बल ५ हजार १८५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित महाराष्ट्रातील शहरांमध्ये पहिल्या क्रमांकावर पुणे, त्यानंतर नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव, अकोला या शहरांचा समावेश आहे. तर नुकत्याच आलेल्या माहितीनुसार मुंबई शहराला असणारा कोरोना संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे, शासन-प्रशासन याबाबत नेमका कोणता महत्त्वपूर्ण निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

घरच्या घरी CoviSelf kit ने कोरोना चाचणी कशी करायची? जाणून घ्या…

News Desk

अजित पवारांनी शरद पवारांसमोर पुण्याच्या महापौर मुरलीधर मोहोळांचे तोंड भरून केले कौतुक

News Desk

राजकारणातील जुनी खाट ‘काँग्रेस’ महाराष्ट्राच्या राजकारणात का कुरकुरतेय ?

News Desk