HW News Marathi
महाराष्ट्र

नागपूरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा सेनेत प्रवेश, पुन्हा आघाडीत नाराजी नाट्य रंगणार?

नागपूर | सध्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. एका पक्षातील कार्यकर्त्याने दुसऱ्या पक्षात जाण्यातच सपाटा सुरुच आहे. नागपूर महापालिकेच्या राजकारणात सध्या काँग्रेस आणि भाजप हे प्रमुख पक्ष आहे. मात्र, नागपुरात शिवसेना महाविकासआघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला तडा लावत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. नुकताच नागपुरातील शहर काँग्रेस कमिटीचे महासचिव अंगद हिंदोरे यांच्यासह ५० ते ६० कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या नेतृत्वात या काँग्रेस कार्यकर्त्यांनी भगवा झेंडा हाती घेतला आहे.

काही दिवसांपूर्वी पारनेरच्या ५ शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे सेनेत नाराजीनाट्य रंगले होते. मात्र, तणाव निर्माण झाल्यामुळे या ५ ही नगरसेवकांनी घरवापसी केली होती. आणि पुन्हा सेनेत प्रवेश केला होता.त्यानंतर आता राज्याच्या उपराजधानीत शिवसेनेत काँग्रेसच्या नेत्यांनी केलेला प्रवेश काय तेढ निर्माण करणार? पुन्हा नाराजी नाट्य रंगणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपाल कोश्यारींना संजय राऊतांकडून खास वाढदिवसाच्या शुभेच्छा, १२ आमदारांच्या नियुक्तीचीही आठवण!

News Desk

शिवसेनेनं काँग्रेसचे मन परिवर्तन करावं, चंद्रकांत पाटलांचा सेनेला सल्ला 

News Desk

“शपथा घेऊन सुटका होत नसते, तुम्हीही वकील गाठा”, भाजपचा अनिल परबांना सल्ला

News Desk