HW News Marathi
महाराष्ट्र

आनंदाची बातमी! पुण्यात ५४८ जणांना डिस्चार्ज

पुणे | महाराष्ट्रात ७४ वरुन आकडा थेट ८९ वर गेला आहे. त्यामुळे देशाचा आणि राज्याचा धोक्यात वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या आणि सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे दिसलेल्या संशयित तसेच ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांपैकी ५४८ जणांच्या घशातील द्रवाची चाचणी ‘निगेटिव्ह’ आली आहे. त्यामुळे ५४८ जणांना घरी सोडण्यात आले आहे. आज ६०३ पैकी फक्त ५५ रुग्ण रुग्णालयात आहेत. २८ जणांच्या नमुन्यांचे अहवाल अद्याप ‘राष्ट्रीय विषाणू संस्थे’कडून (एनआयव्ही) येण्याचे बाकी आहे.

एकीकडे राज्यात रुग्णांची वाढणारी स्थिती असताना राज्याच्या आरोग्य विभागाच्यावतीने पुण्यातील रुग्णांच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. यात किती रुग्ण रुग्णालयात आहेत, किती जणांचे नमुने प्रलंबित आहे किंवा किती रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे याची माहिती घेण्यात आली. पुणे शहरातील नायडू संसर्गजन्य रुग्णालय, पिंपरी-चिंचवडचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) आणि औंध येथील जिल्हा रुग्णालयात या रुग्णांना कोरॉंटाईन करण्यात आले आहे.

या तीनही रुग्णालयात एकूण ६०३ जणांना दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी नायडू रुग्णालयात ४६६ आणि वायसीएम रुग्णालयात १२१ तसेच औंध रुग्णालयात १६ रुग्णांना ठेवण्यात आले. त्यातील एकूण ५४८ जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. उरलेले ५५ रुग्ण रुग्णालयात असून, त्यात नायडू रुग्णालयातील ३४ जण आहेत. ‘वायसीएम’मध्ये २१ आणि औंध रुग्णालयात १६ जण आहेत. १४ दिवसांसाठी ११७ प्रवाशांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. आजमितीला २ हजार ३९३ जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. ८२१ जणांनी १४ दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील प्रत्येक शाळेत फुटबॉल खेळ पोहचविणार! – दीपक केसरकर

Aprna

राजकारणाची पातळी खालावली, रोज उठून पाहावे लागते, आज कोणाचा नंबर? संजय राठोड यांचा आरोप!

News Desk

पुणे शहरातील वाहतूक ३१ मार्चपर्यंत पुर्णपणे बंद

swarit