पुणे | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील मुंबई आणि पुण्यामध्ये रुग्ण वेगाने वाढत आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यातील रुग्णसंख्येने १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. पुणे जिल्ह्यात काल (९ जून) कोरोना रुग्णांची संख्या ९, ९५९ होती. यानंतर अवघ्या १२ तासांत पुणे शहरासह जिल्ह्यातील इतर भागांत मिळून ५३ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे रुग्णसंख्येने १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. पुण्याचा कोरोनाग्रस्तांचा आकडा आता १०,०१२ वर पोहोचला आहे.
दरम्यान, पुण्यात आतापर्यंत ४५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सुदैवाने पुण्यात दिवसभरात ११९ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही ५ हजार ३०४ वर पोहोचली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात काल चार कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ससून रुग्णालयात आतापर्यंत १९१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १४ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून तब्बल २६३ बाधित रुग्ण बरे झाले. यातील काही रुग्ण मुंबई, ठाणे, लातूर, भुसावळ व जळगाव येथील आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.