HW News Marathi
महाराष्ट्र

 कराड येथील विलगीकरण कक्षात असलेल्या ६० वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह

सातारा | कृष्णा हॉस्पीटल, कराड येथे दाखल करण्यात आलेल्या ७ अनुमानित रुग्णांपैकी ६० वर्षीय पुरुष कोरोना (कोव्हीड -१९) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून तो कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर उर्वरित ६ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तसेच जिल्हा रुग्णालयातील कोरोना बाधीत ९ निकट सहवासितांचे घशातील स्त्रावाचा नमुनेही निगेटिव्ह आले असल्याचे एन.आय.व्ही. पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे

काल (६ एप्रिल) जिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या कोविड-१९ बाधीत रुग्णाच्या चौदा निकट सहवासितांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तसेच खासगी रुग्णालयात श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे २ रुग्ण दाखल विलगीकरण कक्षात दाखल केले आहेत. या एकूण १६ जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने एन. आय. व्ही. पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. तसेच काल दुपारी जिल्हा रुग्णालय सातारा येथे तीव्र जंतु संसर्गामुळे दाखल झालेला २५ वर्षीय अनुमानित अत्यावस्थ झाल्याने रात्री त्याला कृष्णा मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असून विलगीकरण कक्षात लागू असलेल्या नियमानुसार उपचार चालू आहेत, असेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कालिदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष, नवनिर्वाचित आमदारांना देणार शपथ

News Desk

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, उद्धव ठाकरेंची ठाम भूमिका

News Desk

पावसामुळे मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा रद्द, ठाकरे ही म्हणाले, मी पुन्हा येईन….

News Desk