HW News Marathi
महाराष्ट्र

‘त्या’ पुस्तकात महाराजांचा किंचितही अपमान झालेला नाही !

मुंबई | ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा किंचितही अपमान झाला नाही. त्यांचा अपमान आम्ही सुद्धा सहन करू शकत नाही,” असे स्पष्टीकरण भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी दिले आहे. भाजप नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून राज्याचे राजकारण तापले आहे. या पुस्तकारचे प्रकाशन काल (१२ जानेवारी) करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्यामुळे हा वाद पेटून उटला आहे. यावरून कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या ट्वीटरवर वाग्युद्ध रंगले होते.

मोदींच्या बद्दल लोकांनी कितीही गरळ ओकली, तरी मोदी दम खमने निर्णय घेणारे ठाम नेते आहेत, असे भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी म्हटले आहे. जाजू पुढे म्हणाले की, “देश विदेशामध्ये त्यांची प्रतिमा आहे ती कोणी रोखू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये जे गुण होते. निर्णायक क्षमता, पराक्रम आणि नियोजन हे सर्व गुण पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये लोक पाहतात. पूर्वी शिवसेनेचे काम करणारे दिल्लीमधील जयभगवान गोयल यांनी ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ नावाचे पुस्तक लिहले. या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा किंचितही अपमान झाला नाही. त्यांचा अपमान आम्ही सुद्धा सहन करू शकत नाही.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्याआधी अधिकृतरित्या त्यांना दत्तक घ्या”, नागपूर खंडपीठाचा आदेश

Aprna

राणेंच्या अटकेविरोधात भाजपचे नेते राजभवनावर दाखल!

News Desk

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकप्रिय ठरले, त्यांना पंतप्रधान करा’, पृथ्वीराज चव्हाण

News Desk