HW News Marathi
महाराष्ट्र

‘दोन शिवसैनिकांची भेट’, भेटीनंतर अमोल कोल्हे म्हणाले…..

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी खासदार अमोल कोल्हे यांची नुकतीच भेट झाली आहे. या भेटीवरून आता राजकीय वर्तुळात चांगलंच चर्चांना उधाण आलं आहे. राऊतांच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंनी त्यांच्या विषयी ट्विट केलं आहे. ‘शिवसेनेचे खासदार संजय राऊत साहेब यांची भेट झाली.त्यांची भेट ही नेहमीच पर्वणी असते’, असं अमोल कोल्हेंचं म्हणणं आहे.

काय आहे ट्विट?

अमोल कोल्हे यांनी राऊतांच्या भेटीविषयी ट्विट केलं आहे. “शिवसेनेचे खासदार संजय राऊत साहेब यांची भेट झाली. त्यांची भेट ही नेहमीच पर्वणी असते. महाविकास आघाडी, मतदारसंघातील प्रकल्प अशा अनेक विषयांवर त्यांच्याशी चर्चा करता आली. मतदारसंघात ‘महाविकास आघाडी’ म्हणून काम करताना राऊत साहेबांनी केलेल्या मार्गदर्शनाचा नक्कीच लाभ होईल”, असं ट्विट कोल्हेंनी भेटीनंतर केलं आहे.

आधी शिवसैनिक मग राष्ट्रवादीत

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे आधी शिवसैनिक होते. खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकारणाला सेनेमधूनच सुरुवात झाली. त्यांचं आक्रमक रुप, भाषण करण्याची स्टाईल, ते सारारत अससेली शिवाजी महाराजांची भूमिका, अफाट लोकप्रियता, यांच्या बळावर त्यांना राजकारणात फार थोड्या वेळात मोठी प्रसिद्धी मिळाली. पण शिवसेनेत त्यांना निव़णूक लढविण्याची संधी मिळाली नाही.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी खासदार कोल्हे यांनी शिवसेनेला धक्का देत अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधून शिरुर लोकसभेचं राष्ट्रवादीचं तिकीट मिळवलं. शिवसेनेचे दिग्गज उमेदवार आणि विजयी चौकार मारण्यासाठी आसुसलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांना आश्चर्यकारररित्या कोल्हेंनी पराभवाचं तोंड पाहायला लावलं.

नंतर राज्यातली राजकीय समीकरणं बदलली. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आली. राज्यात महालिकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. साहजिक शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जवळीकता वाढत गेली… आताही वाढते आहे… नेते मंडळींमध्ये गाठीभेटी होतायत… चर्चा होतायत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल; ‘या’ कलमा अंतर्गत होणार कारवाई

Aprna

शिक्षकांच्या बदल्या ‘ऑफ लाइन’ होणार?हा निर्णय भ्रष्टाचाराला वाव देणारा निर्णय असेल – पंकजा मुंडे

News Desk

राज्यात म्युकरमायकोसिसच्या उपचारांचे दर निश्चित, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय!

News Desk