HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

Pune wall collapse : निष्काळजीपणा करणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा !

मुंबई | विधानसभेत पुणे येथील कोंढवा परिसरात भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये परराज्यातील मजुरांचा समावेश होता. या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज (१ जुलै) विधानसेभेत सोसायटीतील नागरिकांनी महापालिका आणि पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. परंतु, याकडे दुर्लक्ष का केले गेले? वेळीच या तक्रारीची दखल घेतली असती तर कदाचित ही घटना घडली नसती, असा सवाल पवार यांनी विभानसभेत उपस्थित केला. आणि या संदर्भात निष्काळजीपणा करणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधानसभेत त्यांनी केली आहे.

या मजुरांची नोंद नसल्याने मृत मजुरांना मदत करताना अडचण होते. मग बांधकाम व्यावसायिकांनी मजुरांच्या नावाची नोंद का केली हा प्रश्न आहे. पार्किंगसाठी इमारतींमध्ये बेसमेंट तयार केले जातात. त्यामुळे इतर बांधकामाला धोका पोहचतो चुकीच्या पद्धतीने काम करणारे, करोडो रुपये कमविणारे बांधकाम व्यावसायिकांवर चाप बसवण्यासाठी सरकारने कठोर निर्णय घेण्याची गरज असल्याचे पवारांनी सांगितले. अशा घटना घडल्यानंतर काही काळ चर्चा होते, पुन्हा मात्र काही काळानंतर याकडे दुर्लक्ष होऊन प्रकरण शांत होते. अशा घटनांमध्ये कारवाई कितपत होते, हेही कळत नाही असेही अजित पवार म्हणाले.

अशी घडली घटना

पुण्यातील कोंढवा परिसरातील बडा तालाब मस्जिद परिसरात आल्कार स्टायलस या इमारतीची संरक्षण भिंत कोसळून १५ मजुरांचा मृत्यू झाला असून ही दुर्घटना शुक्रवारी (२८ जून) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. अग्निशमन दल आणि स्थानिकांकडून बचावकार्य सुरु असून मृतांमध्ये ११ पुरुष, ३ महिला आणि ४ मुलांचा समावेश आहे. या दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना एनडीआरएफकडून ४ लाख रुपये, तर बांधकाम अपघात विम्याची ५ लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतांना ५ लाख तर २५ हजार रुपये मदत देण्यात आली

Related posts

काँग्रेसचा इतका दारुण पराभव झाला तरीही राहुल गांधींमध्ये सुधारणा झाली नाही !

News Desk

ठाकरे सरकारच्या शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर

अपर्णा गोतपागर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने जनतेला पत्र

News Desk