HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकास आघाडी सरकारमध्ये आपली जागा फक्त खलिता वाहणाऱ्या काशिदाची; साटमांचा राऊतांना टोला

मुंबई | महाराष्ट्रातील महाविकासआघाडीचे सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात आहे, असा खळबळजनक दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्रतून केला आहे. राऊतांच्या आरोपावर भाजपचे आमदार अमित साटम यांनी व्हिडिओद्वारे टीका केली आहे. “घरात घुसायची भाषा करता पण स्वत:च्या घरात तुमची किती किंमत आहे हे आम्हाला चांगले माहित आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये आपली जागा फक्त खलिता वाहणाऱ्या काशिदाची आहे,” साटम म्हणाले.

साटम म्हणाले, “भ्रष्टाचार करायचा आणि तो बाहेर काढला की किरिट भाईंवर भेकड हल्ले करायचे. आणि आता प्रविण राऊत यांना अटक झाल्यामुळे साहाजिकच तुमचे मानसिक संतुलन ढासळले आहे. हुल्लडबाजी ही भाजपची संस्कृती नाही. पण तुमच्या सारख्यांना तुमच्याच भाषेत बोलायचे तर तुम्ही एकदा प्रशासनाला बाजूला ठेवा, वेळ आणि जागा सांगा, मग भाजप कार्यकर्त्यांच्या मनगटातली ताकद पहा. हे या मराठ्याचं तुम्हाला खुलं आव्हान आहे, असे आव्हान त्यांनी केले आहे. 

राऊतांनी उपराष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात म्हटले, “महाराष्ट्रातील महाविकासआघाडीचे सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव आणला असून राज्यात मध्यावर्धी निवडणूक करण्यासाठी प्रसत्न करत आहे. मात्र, मी या सर्वांना नकार दिल्याचेही स्पष्ट केले आहे. ठाकरे कुटुंबिय, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. यासंदर्भात मी मुख्यमंत्री, महाविकासआघाडी आणि राज्यातील इतर नेत्यांशी चर्चा झाली आहे. हुकूमशाही पद्धतीने राज्य करणाऱ्यांना बद्दल बोलावे लागेल,” असे ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंची ‘ही’ प्रतिक्रिया

News Desk

नवाब मलिक वैफल्यग्रस्त झालेत प्रविण दरेकरांची टीका!

News Desk

राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर, कार्यकर्त्यांशी संवाद

News Desk