मुंबई | माझगाव डॉकमध्ये निर्माणाधीन आयएनएस विशाखापट्टणमवर भीषण आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. ही आग आज (२१ जून) सायंकाळी ५. ४४ वाजताच्या सुमारास लागली असून अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल असून अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी पथकासहा आग विझविण्याचे कार्य करत आहेत. या आगीत युद्धनौकेत एकजण अडकल्याची भीती वर्तविण्यात आली आहे.
#UPDATE: One person is suspected to be trapped inside the ship. Fire is confined on the second and the third floor of the ship. Fire fighting operations underway. #Maharashtra pic.twitter.com/agsfWea4gr
— ANI (@ANI) June 21, 2019
घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाचे ८ फायरवाहन, ७ जम्बो वॉटर टँकर आणि १ रेस्क्यू वाहन उपस्थित असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. या घटनेत अद्याप कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे मुंबई आपत्ती व्यवस्थापन कक्षातून मिळाली आहे. आयएनएस विशाखापट्टणम ही संपुर्णपणे भारतीय बनावटीची ही युद्धनौका स्टेल्थ गटातील आहे. या युद्धनौकेचे काम सुरु आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.