HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

#COVID19 : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या पाश्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (७ एप्रिल) बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नेत मंडळी उपस्थित होती. ही बैठक आज वर्षा निवसस्थानी पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी ५ महत्त्वचे निर्णय घतले आहे.

पुण्यात कोरोनाबाधित असलेल्या तिघा नागरिकांचा आज मृत्यू झाला. तर राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत आज आणखी १० रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यात आता कोरोनाबाधितांचा आकडा ८९१ वर पोहोचला आहे. उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊनच्या काळात गरिबांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. आता केशरी शिधापत्रिका धारकांनाही स्वस्त दरात धान्य मिळणार आहे.

ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील निर्णय

१. केशरी शिधापत्रिका धारकाना एप्रिल ते जून 2020 या कालावधीसाठी सवलतीच्या दराने अन्नधान्य देण्याबाबत.

२. कोविडच्या पार्श्वभूमीवर धर्मादाय संस्थांकडून आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था अधिनियमात सुधारणा.

३. शिवभोजन योजनेचा तालुका स्तरावर विस्तार करून पुढील तीन महिने 5 रुपये इतक्या दरात शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय.

४. कोरोना विषाणुबाबत उपाययोजनांची माहिती.

Related posts

मालेगाव येथे काँग्रेस-राष्ट्रवादीचा रस्ता रोको

News Desk

मुंबईत शरद पवारांच्या उपस्थित होणार शेतकरी आंदोलन !

News Desk

अमावस्येच्या फेऱ्याला एक वर्ष पूर्ण झालं, फडणवीस-पवारांच्या शपथविधीवरुन राऊतांचा टोमणा 

News Desk