HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेच्या आजच्या बैठकीत मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा नाहीच ? 

मुंबई | मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची थोड्याच वेळापूर्वी शिवसेना नेते आणि मंत्र्यांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे. या बैठकीत राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेनंतर आता शिवसेनेनाही राज्यभरात ‘शिवसंपर्क’ अभियान राबवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली आहे. खरंतर, शिवसेनेच्या या बैठकीत राज्यभर गाजणाऱ्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या शिवसेना नेते आणि मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा होण्याची शक्यता होती. कदाचित या बैठकीत संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय आणि अधिकृत घोषणाही होऊ शकते असेही म्हटले जात होते. मात्र, या बैठकीत या मुद्द्यावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितले आहे.

शिवसेना नेत्यांच्या माहितीनुसार शिवसेनेच्या आज (१६ फेब्रुवारी) झालेल्या बैठकीत, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आता २३ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारीदरम्यान राज्यभरात शिवसेनेचे ‘शिवसंपर्क’ अभियान राबवले जाणार आहे. शिवसेनेला गावोगावी पोहोचवण्याचे आदेश यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत असे आढळराव-पाटील यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर शिवसेनेची ही बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, मंत्री, आमदार, खासदार आणि राज्यातील सर्व जिल्हा प्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख असे अनेक जण उपस्थित होते. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर शिवसेनेची ही पहिलीच इतकी बैठक होती. मात्र, या बैठकीत अडचणीत सापडलेल्या मंत्री संजय राठोड यांच्याबाबत चर्चा झाली नसल्याचे म्हटले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडे यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

News Desk

नाथाभाऊंच्या प्रदीर्घ अनुभवाचा आम्हाला फायदा होईल – धनंजय मुंडे

News Desk

केंद्राच्या सुरक्षा व्यवस्थेमुळे तरी राणेंना सुखाने झोप लागेल, शरद पवारांचा खोटक टोला 

News Desk