HW News Marathi
महाराष्ट्र

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे भूमिपूजन उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार, राज ठाकरेंना निमंत्रण नाही?

मुंबई | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा भूमिपूजन सोहळा आज (३१ मार्च) पार पडणार आहे. आज संध्याकाळी ५ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शिवाजी पार्क येथील महापौरांचे जुने निवासस्थान या स्मारकाची नियोजित जागा आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबतची माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाने नुकतंच मुख्यमंत्र्यांच्या दिवसभरातील विविध कार्यक्रमांची माहिती दिली. या माहितीनुसार उद्धव ठाकरे सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळयास अभिवादन करणार आहेत. त्यानंतर दुपारी ३,३० वाजता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

यानंतर संध्याकाळी ५.०० वाजता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले जाणार आहे. दादरच्या शिवाजी पार्कमधील जुना महापौर बंगल्यात हा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण करण्यात येईल, अशी माहिती शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा ठराविक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थितीत राहणार आहेत. महत्वाचे म्हणजे या कार्यक्रमासाठी विरोधी पक्ष नेत्यांना तसेच., मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही निमंत्रण दिले नसल्याचे समजत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर निमंत्रण दिले नाही आहे की यात आणखी काही कारण आहे याची मात्र सध्या चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.

स्मारकाचे काम दोन टप्प्यांत होणार

मुंबई महापौर यांच्या निवसास्थानाच्या परिसरात होणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी राज्य सरकारने एकूण ४०० कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. बाळासाहेबांच्या स्मारकाचे काम एकूण दोन टप्प्यांत चालणार आहे. पहिल्या टप्प्यात स्थापत्य, विद्युत, वातानुकुलित यंत्रणा उभारणी, इमारतीच्या अंतर्गत आणि बाह्य सजावट, वाहनतळ उभारणी, बागबगिचा तयार करणे, रेनवॉटर हार्वेस्टिंग इत्यादी कामं केली जातील. या सर्व कामांसाठी पहिल्या टप्प्यात अंदाजे २५० कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय, ९०० गावे दुष्काळ ग्रस्त यादीत

News Desk

इतक्या लाटा आल्या तरीही शिवसैनिकांनी आपला बालेकिल्ला राखला !

News Desk

स्वाभिमानी शेतकरी  संघटनेकडून केंद्र सरकारचा निषेध करत अनोखे आंदोलन!

News Desk