HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांच्या हस्ते होणार तावडे अतिथी भवना” चे उदघाटन

मुंबई | राजापूर तालुक्यातील आडीवरे गावी नव्याने बांधलेल्या तावडे अतिथी भवनाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते १० मे रोजी सकाळी ११ वाजता मोठ्या थाटात उदघाटन होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे हे उपस्थित राहणार आहेत.

तसेच स्थानिक खासदार विनायक राऊत, स्थानिक राजन साळवी तसेच तावडे संस्थेचे अध्यक्ष दिनकर तावडे, सचिव सतीश तावडे खजिनदार शंकरराव तावडे,उपाध्यक्ष सुहास तावडे,उपाध्यक्ष राजेंद्र तावडे आणि संपूर्ण तावडे परिवार यावेळी उपस्थित राहणार आहेत.

अतिथी भवनाचे १ डिसेंबर २०१४ रोजी राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर आता ही वास्तू पूर्ण होऊन उदघाटनाच्या प्रतिक्षेत आहे. प्रसिद्ध वास्तुविशारद संतोष तावडे यांनी या वास्तूचे सुंदर देखणे डिझाईन बनविले आहे.

या वास्तूकडे वास्तूशिल्पाचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून पाहता येईल. सुमारे पंधरा हजार चौ.फूट.बांधकाम असलेली बेसमेंट आणि दोन मजली इमारत असून येथे राहण्यासाठी सुसज्ज आठ रूम,समोर सुंदर उद्यान,सांस्कृतिक व सामाजिक केंद्र इत्यादी सुविधा आहेत.

तावडे समाजाच्या ८०० वर्षांच्या इतिहासाचा वारसा या वस्तूला लाभलेला आहे. येथे निसर्गाने केलेली मुक्त उधळण,पुरातन महाकाली मंदिर आणि निवासाची उत्तम सोय वास्तुमुळे उपलब्ध झाली आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकाना व भाविकांसाठी हि वास्तू आणि वातावरण एक पर्वणी ठरणार आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निश्चय करुया मुख्यमंत्री उध्दव ठाकरे…!

News Desk

बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार हरला तर त्याला शिवसेना जबाबदार असेल!

News Desk

जन्माने नाही, तर कर्माने व्यक्ती मोठी होते! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna