HW News Marathi
महाराष्ट्र

…म्हटल्याप्रमाणे राष्ट्रवादीत इन्कमिंगला सुरूवात – नवाब मलिक

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजपमधून अनेक नेते एक्झिट करत प्रवेश करताना दिसत आहेत. दरम्यान, यावरूनच राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाष्य केले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात स्पष्ट संकेत दिले की ४ महिन्यांच्या आत भाजपचे अनेक आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यामूळे आगामी काळात जे आमदार ६ वर्षांपूर्वी, दीड वर्षांपूर्वी पक्ष सोडून गेले होते त्यांच्या इन्कमिंगला सुरूवात झाली आहे, असं नवाब मलिक यांनी म्हटले आहे. तसेच, आज भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामूळे आणखी कोणते बडे नेते, आमदार पक्ष प्रवेश करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

तसेच, राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी सरकारने राज्यपालांना सुपूर्द केली असली तरीही अजून त्यावर निर्णय झाला नाही आहे. यावर देखील नवाब मलिक यांनी भाष्य केले आहे. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नावे सरकारकडून देण्यात आली आहेत त्यावर अजून निर्णय झाला नाही. राज्यपालांना आमची इतकी विनंती आहे की लवकरात लवकर यावर निर्णय द्यावा. ती १२ माणसे लवकरात लवकर जनतेच्या सेवेत लागतील त्यामूळे हा निर्णय द्यावा, अशी विनंती यावेळी मलिक यांनी राज्यपालांना केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“रश्मीताई, राऊतांसारख्या तालिबानी प्रवृत्तीच्या मुसक्या तुम्ही कधी आवळणार?”, भाजपचा शिवसेनेला सवाल

News Desk

महात्मा ज्योतिबा फुले यांचे ‘शेतकऱ्यांचे आसूड’ हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी ठरेल! – उद्धव ठाकरे

Manasi Devkar

राज्यपालांनी भाजप कार्यकर्त्यासारखे वागत पदाचा सन्मान ठेवला नाही – बच्चू कडू

News Desk