HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इंकमिंग सूरू? सुबोध मोहिते राष्ट्रवादीच्या वाटेवर?

नागपूर | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरूच आहे. आता माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची त्यांनी भेट घेतली असून, मोहितेंच्या पक्ष प्रवेशावर जोरदार खलबतं सुरू आहेत. विदर्भातील राजकारणात सुबोध मोहिते यांचा चांगलाच दबदबा आहे. त्यामुळेच विदर्भात राष्ट्रवादी बळकट करण्यासाठीच मोहितेंना प्रवेश देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.

माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला होता, परंतु त्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी मतभेद निर्माण झाले आणि त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी संबंध तोडले. मोहिते यांनी शेतकरी व तरुणांच्या प्रश्नांवर नवीन संघटना स्थापन करण्याची घोषणा केली होती.

कोण आहेत सुबोध मोहिते?

अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये सुबोध मोहिते केंद्रीय अवजड उद्योगमंत्री राहिले होते. राजकारणात येण्यापूर्वी ते भाजपचे माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांचे स्वीय सहाय्यक होते. १९९८ मध्ये त्यांना शिवसेनेनं रामटेक मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या बनवारीलाल पुरोहित यांचा पराभव केला. १९९९ मध्ये पुन्हा एकदा त्यांनी श्रीकांत जिचकार यांना पराभवाची धूळ चारली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वातंत्र्याची व्याख्या सोयीनुसार बदलली आहे, सामनातून भाजपवर रोख

News Desk

भुजबळांचा तुरुंगवास हे एक राजकीय षडयंत्र

News Desk

जयंत पाटील अलर्ट… संभाव्य पूरपरिस्थितीचा धोका लक्षात घेत प्रशासनाशी घेतली बैठक!

News Desk