HW News Marathi
महाराष्ट्र

सलग बाराव्या दिवशीही पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

मुंबई | सलग बाराव्या दिवशी देखील पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. आज पेट्रोल ३६ तर, डिझेलमध्ये २२ पैशांनी महागले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता पेट्रोल ८६. ३६ रूपये लिटर झाले आहे. देशात सर्वात महाग पेट्रोल-डिझेलची विक्री ही महाराष्ट्रात होत आहे. तर कर्नाटक निवडणुकीच्या काही दिवस आधी पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. परंतु कर्नाटक निवडणूक संपल्यानंतर मात्र दररोज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे.

पेट्रोलच्या दरामध्ये सतत वाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. सोशल मीडियावर केंद्र सरकारच्या पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात सर्व स्तरातून टीका होत आहे. पेट्रोलियम कंपन्यांचा प्रत्यक्ष दर पेट्रोलसाठी ३७.१९ रुपये आहे. त्यावर २५.४४ टक्के एक्साईज ड्युटी, २१.२६ टक्के व्हॅट व ४.७२ टक्के डिलर्स कमिशन आकारले जाते. जवळपास ५२ टक्के कर लादल्यानंतर सर्वसामान्य जनतेला पेट्रोल विक्रीसाठी उपलब्ध केले जाते.

केंद्र सरकारने तर उत्पादन शुल्क घटविण्यास नकार देत हात झटकले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत होणा-या वाढीचा निषेध व्यक्त करण्यासाठी मोदी सरकार विरोधात सर्व राजकीय पक्ष रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

“पुणे-नाशिक रेल्वे मार्गासह अन्य प्रकल्पांना गती द्या”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘महारेल’ला निर्देश

Aprna

पुणे महानगरपालिकेने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे! – चंद्रकांत पाटील

Aprna