मुंबई | संपूर्ण देशाला कोरोनाचा घट्ट विळखा असताना आता महाराष्ट्राची चिंता चांगलीच वाढली आहे. एकट्या महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता लाखाच्या जवळपास पोहोचल्याने राज्य सरकार आणि प्रशासनावरील ताण वाढण्याची शक्यता आहे. राज्यात आज (११ जून) दिवसभरात तब्बल ३,६०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता ९७,६४८ वर पोहोचला आहे. तर राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनामुळे १५२ जणांनी आपला जीव गांवला आहे. त्यामुळे, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची राज्यातील एकूण संख्या झालेल्या ३५९० वर गेली आहे. मात्र, एक दिलासादायक बाब अशी कि, गेल्या २४ तासात राज्यात १५६१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
Highest single-day rise with 3607 new COVID19 cases & 152 deaths reported in the state today, taking the total number of positive cases in the state to 97,648: Maharashtra Health Department pic.twitter.com/1xyHQMiWEI
— ANI (@ANI) June 11, 2020
राज्यात आज झालेल्या १५२ मृत्यूपैकी ३५ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहे. तर उर्वरित मृत्यू हे १ एप्रिल ते ८ जून या कालावधीत आहे. दरम्यान, मुंबईतही कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असून, मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ५४ हजार ८५ वर पोहोचला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.