HW Marathi
महाराष्ट्र

कौमार्य शस्त्रक्रियेचे पुणे-मुंबईमध्ये वाढते प्रमाण

पुणे | पुरोगामी महाराष्ट्रात कंजारभाट समाजातील तुरुणी कौमार्य चाचणीविरोधात आवाज उठवत आहे. तर दुसरीकडे विविध वर्गातील तरूणींकडूनच ‘कौमार्य’ पुन:प्राप्तीसाठी केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी हजारो रूपये मोजले जात आहेत. यात पुणे-मुंबईमध्ये वर्षाला २० ते ३० तरुणी कौमार्य शस्त्रक्रिया करून घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सायकलिंग, व्यायाम आदींमुळे पटलाचा पापुद्रा फाटू शकतो, वैद्यकीय तज्ज्ञांनी हे सत्य अनेकदा जाहीरद्वारे सांगितले आहे. तसेच महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठानेही ‘कौमार्य चाचणी’ अवैज्ञानिक मानत हा विषयच अभ्यासक्रमातून वगळला आहे. तरीही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात ‘कौमार्य’विषयीचा दृष्टीकोन बदललेला नसल्याचे वास्तव समोर येत आहे.

 

Related posts

बीडच्या सेक्स रॅकेटमधील दोन्ही अंकलला अटक

News Desk

शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बँकांनी पीक कर्ज तातडीने उपलब्ध करुन दया- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे

News Desk

” पंचवीस वर्षे युतीत सडली हे कळायला इतका उशिर का लागला? ‘

News Desk