HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र राजकारण

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण

मुंबई | भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार आणि भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती  समोर आली आहे. लांडगे यांच्यावर चिंचवड येथील  बिर्ला रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. अत्यंत हायरिस्क वातावरणात सामाजिक बांधिलकीपोटी त्यांचा मतदार संघातील लोकांशी संपर्क आला होता. या बैठकीमध्ये लाडगे यांच्या अनेक नेत्यांशी संपर्क आला आहे.

दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुण्यात आले होते. त्यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिका-यांची बैठक घेतली. यावेळी राज्याचे बडे मंत्री तसेच स्थानीक पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीला आमदार महेश लांडगे हे देखील उपस्थित होते.

मुंबईनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड कोरोनाचा केंद्रबिंदू बनले आहे. पिंपरी चिंचवड येथे दररोज १५० ते २०० च्या आसपास कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयाला भेट दिली. यावेळी लांडगे हे रुग्णालयात प्रशासनाकडून कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी लांडगे फडणवीस यांच्यासोबत बराच वेळ होते.

 

Related posts

वाडिया रुग्णालयाला ४६ कोटी देणार, अजित पवारांचे आश्वासन

News Desk

दिलासादायक! रत्नागिरीत ४ दिवसांपासून एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही

News Desk

अभी इश्क़ के इम्तिहाँ और भी हैं !

News Desk