HW News Marathi
Covid-19

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण

मुंबई | भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार आणि भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. लांडगे यांच्यावर चिंचवड येथील बिर्ला रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. अत्यंत हायरिस्क वातावरणात सामाजिक बांधिलकीपोटी त्यांचा मतदार संघातील लोकांशी संपर्क आला होता. या बैठकीमध्ये लाडगे यांच्या अनेक नेत्यांशी संपर्क आला आहे.

दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुण्यात आले होते. त्यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिका-यांची बैठक घेतली. यावेळी राज्याचे बडे मंत्री तसेच स्थानीक पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीला आमदार महेश लांडगे हे देखील उपस्थित होते.

मुंबईनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड कोरोनाचा केंद्रबिंदू बनले आहे. पिंपरी चिंचवड येथे दररोज १५० ते २०० च्या आसपास कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयाला भेट दिली. यावेळी लांडगे हे रुग्णालयात प्रशासनाकडून कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी लांडगे फडणवीस यांच्यासोबत बराच वेळ होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाची लक्षणे नसल्यास किंवा सौम्य लक्षणे असल्यास आता घरीच विलगीकरण करता येणार, जाणून घ्या नियम

News Desk

महाराष्ट्रात पुढच्या 2 ते 4 आठवड्यात तिसरी लाट? टास्क फोर्सने खरंच असं सांगितलंय? सत्य काय ?

News Desk

#Aurangabad : मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधितून प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर

News Desk