HW News Marathi
Covid-19

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये थोडी वाढ, कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढली

नवी दिल्ली | देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सलग काही दिवस मोठी घट पाहायला मिळत होती.गेल्या २४ तासांत १ लाख ३२ हजार ७८८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ३ हजार २०७ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत.

नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आणि कोरोनाबळींच्या संख्येत थोडी वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, दिलासादायक बाब अशी आहे की, कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे.

देशात गेल्या २४ तासात १ लाख ३२ हजार ७८८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३ हजार २०७ रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात २ लाख ३१ हजार ४५६ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

 

महाराष्ट्रातील स्थिती काय?

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत १४,१२३ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ३५,९४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याने प्रमाण ९४.२८ टक्के इतकं झालं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘या’ ३ कारणांमुळे देशात कोरोना रूग्ण वाढले, मोदींनी सांगितले कारण

News Desk

ठाकरे सरकारचा निर्णय! राज्यातील सर्व आशा सेविकांना २ हजार, तर आशा गटप्रवर्तकांना ३ हजार मानधन

News Desk

देशात गेल्या २४ तासात ४१ हजार ३८३ नवे रुग्ण!

News Desk