HW News Marathi
देश / विदेश

दिलासादायक! भारतात कोरोनाच्या रुग्णांवर प्लाझा पद्धती अवलंबणार

मुंबई | कोरोनाला रोखण्यासाठी जगभरात अनेक प्रकाराच्या उपचारपद्धतीचा वापर करण्यात येत आहे. दरम्यान, भारतात कोरोनाबाधितांवर जे उपचार केले जात आहेत त्यात बदल होणार आहे. ही चाचणी चीन, अमेरीका, दक्षिण कोरीयाने अवलंबली होती जी आता भारतातही वापरली जाणार आहे. ही पद्धत आहे प्लाझ्माची पद्धत. माणसाच्या प्रतिकारशक्तीखाली तयार केलेले अँटीबॉडी एक नैसर्गिक औषध आहे. जे कोणत्याही संसर्गाविरूद्ध प्रभावीपणे प्रतिबंध करते. ICMR या कोरोना उपचार पध्दती निश्चित करणाऱ्या संस्थेने तशी परवानगी दिली आहे.

कोरोनाच्या विळख्यातून बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तातील बाधित प्लाझ्मा रुग्णांना देण्यात येणार आहे. दरम्यान, या उपचार पद्धतीवर काही मर्यादा आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. मनोज मुराहेकर म्हणाले, की सध्या आयसीएमआरकडून केरळला प्लाझ्मा उपचारांच्या क्लिनिकल चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच राज्य सरकारही ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून मान्यता घेत आहे. तसेच, ही उपचारपद्धती जे रुग्ण व्हेंटीलेटर आहेत त्यांच्यावरच करण्यात येणार आहे.

माणसाची प्रतिकारशक्ती कोणत्याही रोगाला आपल्या शरीरात येण्यासाठी रोखून ठेवते हे एक नैसर्गिक औषध आहे. जे कोणत्याही संसर्गाविरूद्ध प्रभावीपणे प्रतिबंध करते. शरीरातील कोणत्याही विषाणूविरूद्ध किंवा बाह्य संसर्गाविरूद्ध प्रतिपिंडे त्यांना पेशींमध्ये सामील होण्यापासून रोखतात. कोरोना विषाणूमुळे पसरलेला कोविड-१९ साथीचा रोग हा देखील SARS एक प्रकार आहे. अशा परिस्थितीत असे मानले जाते की सार्स प्रमाणेच, या आजाराने बरे झालेल्या लोकांच्या शरीरात सुमारे एक वर्षासाठी पुरतील इतके प्रतिपिंडे असतात. गोळा केलेला प्लाझ्मा अनेक आठवडे जतन करता येऊ शकतो. सध्या राज्यात कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आलेले आणि नंतर ही चाचणी निगेटिव्ह आलेले ८० जण आहेत. या ऍन्टीबॉडिजची तपासणी कोचीतील राजीव गांधी सेंटर फॉर बायोटेक्‍नॉलॉजी येथे करण्यात येणार आहे. केरळमध्ये करोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ३४५ आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सगल तीन दिवस बँका रहाणार बंद

News Desk

जागतिक महिला दिनानिमित्ताने गुगलने दिले १४ भाषेतील प्रेरणादायी संदेश

News Desk

वनविभागाच्या पथकाला दिसले अवनी वाघिणीचे बछडे ?

News Desk