HW News Marathi
Covid-19

इंदोरीकर महाराजांचा निलेश लंकेंना पाठिंबा, ऑडियो क्लिप व्हायरल

अहमदनगर | पारनेर तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे आमदार निलेश लंके यांच्यावर रोष असल्याचे समोर आले होते. मात्र कीर्तनकार इंदोरीकर महाराजांनी आमदार निलेश लंके यांचे कौतुक करत त्यांना पाठिंबा दिला आहे.

कुत्रे कितीही भुंकले तरी हत्ती थाटात चालत असतो, असे सांगत निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी निलेश लंके यांना धीर दिला आहे. निलेश लंके यांनी उभारलेल्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरात इंदोरीकर महाराजांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी इंदोरीकर महाराजांनी निलेश लंके यांच्या कामाचे कौतुक करत आपल्या शैलीतून झालेल्या आरोपंकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला आहे.

निलेश लंके यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली

याआधी आमदार निलेश लंके यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. ‘असे भ्रष्ट अधिकारी तालुक्यात नकोत, वेळ पडली तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलेन असं अण्णा हजारेंनी म्हटलं आहे. यावेळी ज्योती देवरे यांच्या कामाबाबत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी विभागीय आयुक्तांना पाठवलेल्या अहवालाची प्रत निलेश लंके यांनी अण्णांना दाखवली. त्यानंतर अण्णा हजारे यांनी देखील ज्योती देवरे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. इतकेच नाही तर योग्य त्या कारवाईसाठी वेळ पडली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणार असल्याचे अण्णांनी सांगितले आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांनी अनेक कामात हस्तक्षेप करून हलगर्जीपणा केल्याचा ठपका आहे. तसेच वाळू साठ्यात गैरव्यवहार करून शासनाचे मोठं नुकसान केल्याचा ठपका देखील त्यांच्यावर आहे. ज्योती देवरे यांनी शासकीय कामात नितांत सचोटी व कर्तव्यपरायणता ठेवली नाही. कामाची जबाबदारी नीटपणे पार पाडली नाही. कामात हयगय केली आहे. वरिष्ठांच्या आदेशाचा भंग केला आहे, असे अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धक्कादायक ! बीडमध्ये कोरोना योद्ध्याला मिळाली नाही ॲम्बुलन्स, पॉझिटिव्ह असताना रात्रभर ड्युटी

News Desk

Pravin Darekar HW Exclusive : केंद्रानेही राज्याला आर्थिक मदत केली पाहिजे, भाजपची प्रामाणिक भावना !

News Desk

सगळ्यांसाठी समान नियम ठेवा, परदेशी कंपन्यांच्या लसींसाठी नियम शिथिल केल्यानंतर सिरमची केंद्राकडे मागणी

News Desk