HW News Marathi
महाराष्ट्र

इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ, उच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल

संगमनेर| कीर्तनकार इंदोरीकर महाराज आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी कायमच चर्चेत असतात, या आधी त्यांना यांना वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी संगमनेर सत्र न्यायालयाने दिलासा दिला होता. पण, आता उच्च न्यायालयात सरकारी पक्षाकडून याचिका दाखल झाल्यामुळे इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पुत्र प्राप्तीसंदर्भात किर्तनात केलेल्या वक्तव्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संगमनेरच्या दिवाणी न्यायालयात गुन्हा दाखल केला होता. या विरोधात इंदोरीकर महाराजांनी संगमनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. गेले काही महिने सरकारपक्ष आणि अंधश्रद्धा निर्मूलन समीतीने इंदोरीकर कसे दोषी आहेत ही बाजू मांडली होती. मात्र इंदोरीकर यांच्या वकिलांचे म्हणणे रास्त ठरवत जिल्हा न्यायालयाने इंदोरीकर महाराजांना निर्दोष मुक्त केलं होतं.

मात्र, आता सरकारी पक्षाच्या वतीनेही जिल्हा सत्र न्यायालयाच्या निर्णयाला औरंगाबाद हायकोर्टात आव्हान दिले गेले आहे. काल सरकारी पक्षाच्या वतीने खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. आता हायकोर्टात पुन्हा एकदा इंदोरीकर महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर खल होणार असून हायकोर्ट आता इंदोरीकर महाराजांना दिलासा देणार की दोषी ठरवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

इंदोरीकर महाराज यांचे वक्तव्य पीसीपीएनडीटी एक्ट नुसार गुन्हा असल्याची बाजू सरकार आणि अनिसच्या वतीने मांडण्यात आली मात्र इंदोरीकर महाराज यांनी केलेलं वक्तव्य कोणतीही जाहिरात नव्हती त्यास ग्रंथाचा आधार होता, हे ग्राह्य धरत कोर्टाने इंदोरीकर महाराजांच्या बाजूने निकाल दिला होता. ‘आमची लढाई कोणा व्यक्ती विरोधात नसून प्रवृत्ती विरोधात आहे. अशा प्रवृत्तीना वेळीच पायबंद घालायला हवा, असं म्हणत निर्णयाविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हायकोर्टात धाव घेतली होती.

मुला- मुलींच्या सम-विषम वक्तव्याप्रकरणी इंदोरीकर महाराजांची निर्दोष मुक्तता

प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज यांना वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. संगमनेर सत्र न्यायालयाने इंदोरीकर यांची या प्रकरणी निर्दोष मुक्तता केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कोर्टात वाद विवाद सुरू होता. अखेर न्यायालयाने इंदोरीकर महाराजांच्या बाजूने निकाल दिल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला होता.

महाराष्ट्रातील कीर्तन क्षेत्रात ख्यातनाम असलेले इंदोरीकर महाराज गेल्या काही महिन्यापासून वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आले होते. पुत्र प्राप्तीसंदर्भात किर्तनात केलेल्या वक्तव्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संगमनेरच्या दिवाणी न्यायालयात गुन्हा दाखल केला होता. या विरोधात इंदोरीकर महाराजांनी संगमनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सरकारपक्ष आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदोरीकर कसे दोषी आहेत ही बाजू मांडली. तर इंदोरीकर यांच्या वकिलांनी सक्षमपणे बाजू मांडत निकाल इंदोरीकर महाराजांच्या बाजूने लावला होता.

काय आहे प्रकरण?

“स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते” असं वादग्रस्त वक्तव्य महाराज इंदोरीकर यांनी केले होते. लिंग भेदभाव करणाऱ्या या वक्तव्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने इंदोरीकर महाराजांना पीसीपीएनडीटी कायद्यानुसार नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितलं होतं. यावर दिलेल्या कालावधीच्या अखेरच्या दिवशी इंदोरीकरांनी आपल्या वकिलामार्फत उत्तर देत खुलासा केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“ये है उद्धव का ‘नया’ महाराष्ट्र” !!, नितेश राणेंची सरकारवर टीका

News Desk

औरंगाबाद औद्योगिक क्षेत्रात आगामी काळात मोठी गुंतवणूक! – देवेंद्र फडणवीस

Aprna

राज्यात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी मतदान सुरू; तांबे कुटुंबियांनी आणि शुभांगी पाटलांनी केले मतदान

Aprna