HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांबद्दल जाणून घ्या ‘ही’ माहिती

मुंबई | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरावर आणि कार्यालयावर ईडीने छापा टाकला आहे. तसेच, पुत्र विहंग आणि पुर्वेश सरनाईक यांच्या घरावरही ईडीने छापा टाकला आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. तर विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून या कारवाईचे समर्तन केले जात आहे. प्रताप सरनाईक यांनी अर्णब गोस्वामी, कंगना राणावत या प्रकरणात आवाज उठवला होता. तसेच, अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांचा मुद्दाही उचलून धरला होता. यावर मुख्यमंत्री आणि आघाडी सरकारमधील इतर नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर थोडक्यात प्रताप सरनाईकांबद्दल जाणून घेऊयात.

प्रताप सरनाईक कोण आहेत?

प्रताप सरनाईक हे शिवसेनेकडून सलग तिसऱ्यांदा विधानसभेत आमदारपदी निवडून आले आहेत. ठाण्यातील ओवळा माजिवाडा मतदारसंघातून ते आमदारकी भूषवतात. सरनाईक यांचा जन्म वर्ध्याचा. लहानपणी ते मुंबईला स्थायिक झाले.प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादीतून राजकीय कारकीर्द सुरु केली. 2008 मध्ये त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. लगेचच 2009 मधील विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाकडून तिकीट मिळाले आणि ते ठाण्यातून आमदार झाले.

विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांचा परिचय

विहंग हे प्रताप सरनाईक यांचे ज्येष्ठ पुत्र, तर पूर्वेश हे सरनाईक यांचे कनिष्ठ पुत्र. दोघेही युवासेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी सरनाईक भावंडांचे घनिष्ठ संबंध आहेत. पूर्वेश सरनाईक हे युवासेनेचे सचिव आहेत. युवासेनेच्या मोहिमांमध्ये ते सक्रियपणे सहभागी असतात. पूर्वेश यांची पत्नी परिशा सरनाईक या ठाणे महानगरपालिकेत नगरसेविका आहेत. त्या प्रभाग क्रमांक 29 चे प्रतिनिधित्व करतात.

विहंग ग्रुपची माहिती – विहंग ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष म्हणून प्रताप सरनाईक १९८९ पासून ठाणे शहरातील अनेक रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये सहभागी आहेत. विहंग शांतिवन, विहंग गार्डन, सृष्टी कॉम्प्लेक्स, विहंग रेसिडेन्सी, विहंग टॉवर, विहंग पार्क, रौनक टॉवर, विहंग आर्केड आणि रौनक आर्केड असे त्यांचे रहिवासी प्रकल्प आहेत. प्रताप सरनाईक यांचे ठाण्यात विहंग्ज इन हे थ्री-स्टार हॉटेल आहे. विहंग्ज ग्रुपकडे विहंग्ज पाम क्लबचीही मालकी आहे. त्यात स्विमिंग पूल, हेल्थ क्लब, जाकूझी आणि स्क्वॅश अशा सोयींचा समावेश आहे.

संस्कृती दहीहंडी

प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली संस्कृती युवा प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे वर्तकनगर येथे दहीहंडीचे आयोजन करते. संपूर्ण मुंबई-ठाण्यातून विविध दहीहंडी संघ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडीचे आयोजन करण्यात आले नव्हते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विचार ‘उसना’ असला तरी हिंदुत्वाचाच आहे, झेपेल तर पुढे जा!

News Desk

कसब्यातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Aprna

येत्या तीन दिवसात राज्यात दाखल होणार मान्सून

Atul Chavan