नाशिक | राज्याच्या राजकारणात सध्या महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर नेत्यांची पक्षाची धर सोड सुरु आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेला रामराम करत भाजपमध्ये माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. त्यानंतर आता नाशिकमध्ये भाजपला जोरदार धक्का लागला आहे. भाजपचे २ दिग्गज नेते भाजपची वाट सोडत शिवसेनेत आले आहेत. वसंत गिते आणि सुनील बागूल यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत आज (८ जानेवारी) नाशिमध्ये हाती शिवबंधन बांधले आहे.
कोण आहेत वसंत गीते?
वसंत गीते हे मूळचे शिवसैनिकच आहेत. वसंत गीते हे नाशिकमध्ये शिवसेनेचे पाहिले महापौर होते. मनसे स्थापन झाल्यानंतर वसंत गीते यांनी राज ठाकरे यांना साथ दिली होती. नंतर ते मनसेचे आमदार देखील झाले होते. भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांनी मनसे सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता.नाशिक महापालिकेत सत्ता आल्यानंतर भाजपने त्यांचे पुत्र प्रथमेश गीते यांना उपमहापौर पद दिले होते.
कोण आहेत सुनील बागुल?
सुनील बागुल हे देखील मुळचे शिवसैनिकच होते. बागुल शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख होते. त्यांनी आधी राष्ट्रवादी आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या आई भिकुबाई बागुल या भाजपच्या विद्यमान उपमहापौर आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.