HW News Marathi
Covid-19

गोपीचंद पडळकर कोरोना पॉझिटिव्ह आहेत का? तपासणी करावी रुपाली चाकणकर यांची टीका

विजय शिंदे | गोपीचंद पडळकर यांना कोरोना पॉझिटिव्ह आहेत का याची टेस्ट करण्याची गरज आहे. कारण कोरोना रुग्णाचे पहिले लक्षण हे ताप असते आणि तापात माणूस काही बरळतो त्यामुळे खरेच गोपीचंद पडळकर यांना कोरोना झालाय का ? अशी शंका निर्माण झाली असून त्यांची तपासणी करा, तपासणी झाल्यानंतर उपचार करण्यासाठी आघाडी सरकार खंबीर आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आमचे प्रतिनिधी विजय शिंदे यांच्या बरोबर दूरध्वनी वरुन बोलताना व्यक्त केली.

पंढरपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तुलना कोरोना व्हायरस शी केली होती. त्यामुळे राज्यभरातून पडळकर यांच्यावर टीका होत असून राज्यभर आंदोलन सुरू झाले आहेत. या वेळी बोलताना चाकणकर म्हणाल्या की खरंतर मी बारामती विधानसभा मतदारसंघातील लोकांचे आभार मानते की त्यांनी त्यांचे डिपॉझिट जप्त केले व पडळकर सारखा व्हायरस बाहेर ठेवला, धनगर बांधवांन समोर बिरोबाची खोटी शपथ घेऊन दिशाभूल करणारे पडळकर यांनी पवार साहेबांन वर टीका करताना विचार करावा.

बारामती मध्ये जप्त झालेले डिपॉझिट यामुळेच त्यांना नैराश्य आल्याचे दिसून येत आहे बारामती मध्ये येऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच पवार साहेबांचे कौतुक करत असतात त्यांचा तरी आदर्श डोळ्यासमोर ठेवून पडळकर यांनी वागले पाहिजे असे मत रूपालीताई चाकणकर यांनी व्यक्त केले. पडळकर यांनी पवार साहेबांची माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रातील महिला त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१८ वर्षावरील नागरिकांना मोफत लसीचं गिफ्ट मिळणार? अजित पवार म्हणतात…

News Desk

CBSE कडून बारावीच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला सुप्रीम कोर्टात सादर

News Desk

धारावीमध्ये RSS स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घातला,चंद्रकांत पाटलांचा दावा…

News Desk