HW News Marathi
महाराष्ट्र

अल्टिमेटमवर देश चालतोय का?, संजय राऊतांचा राज ठाकरेंना सवाल

मुंबई | “अल्टिमेटमवर देश चालतोय का?, यापूर्वी खूप लोकांनी अल्टिमेटम दिला आहे. १०० दिवसात महागाई कमी होणार होईल. मग, महागाई कमी झाली का?, काही होणार नाही.,” असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विचारला आहे. मंदिरावरील भोंगे उतरवण्याबाबत राज्य सरकारने आज (३ मे) अल्टिमेटमचा शेवटा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बैठक बोलवली असून राज ठाकरेंच्या निवसस्थाना बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच राऊतांनी राज ठाकरे आणि भाजपवर सडकून टीका केली आहे.

आज मनसेने दिलेल्या अल्टिमेटम संपले आहे, असा प्रश्न पत्रकारांनी राऊतांना विचारल्यावर ते म्हणाले, “हे बघा एखाद्या पक्षाने आणि कोणी अल्टिमेटम दिला म्हणून राज्य चालत नाही आणि निर्णय घेतले जात नाही. प्रशासनाची एक व्यवस्था असते. येथे कायद्याचे राज्य आहे म्हटल्यावर, कोणाच्या अल्टिमेटवर निर्णय घेतले जात नाही. आणि राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था व्यवस्थित आहेत. सभेतून इशारा आणि धमक्या दिल्या म्हणजे परिस्थिती बघडली असे होणार नाही. तेव्हा कोणी प्रेमात राहू नये, आम्ही काही इशारे दिले, त्यानुसार संपूर्ण एक्श होईल, असे होत नाही. आज शुभ दिवस आहे. आज आपली अक्षय तृतीया आहे. तर मुस्लिम बांधवांचा रमझान सुद्धा आहे. त्यामुळे लोकांना त्यांचे सण उत्सहात साजरे करावे, एवढेच आम्ही सांगू.”

धमक्या देणाऱ्याची तेवढी ताकत नाही

 मनसेने आज ३ मेचा अल्टिमेटम दिला यावर राऊत म्हणाले, “अल्टिमेटमवर देश चालतोय का?, यापूर्वी खूप लोकांनी अल्टिमेटम दिला आहे. १०० दिवसात महागाई कमी होणार नाही. मग महागाई कमी झाली का?, काही होणार नाही. तुम्हाला असे का वाटते काही तरी होईल, असा उलट सवाल राऊतांनी पत्रकारांना केला. मालेगावमधील मौलवी म्हणतात की, भोंगे काढायला आला तर हात परत घातील का? राऊत म्हणाले, “एखाद्या राजकीय पक्षाला महाराष्ट्राची शांतता भंग करायची असेल. त्यासाठी त्यांना कोणी सुपारी दिली असेल, सर्वप्रथम सरकारने त्यांना सुपारी देणाऱ्यांचा शोध घेतला पाहिजे. हे जे सगळे चालू आहे ना हिंदू औवेसींना सुपारी देऊन महाराष्ट्राची शांतता बिघडवण्यासाठी. मला वाटते सरकार सक्षम आहे. मी काल मुख्यमंत्र्यांना भेटलो. सर्व शांत असून कोणी मनात आणले. म्हणून राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडू शकत नाही. इतके हे राज्य मजबूत पायावर उभे आहे. या राज्याच्या प्रशासनाला फार मोठा अनुभव आहे. आणि राज्यकर्त्यांना राज्य चालवण्याचा अनुभव आहे. कोणी उठतो आणि धमक्या देतो. हे करू आणि ते करू, असे नाही होणार. धमक्या देणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, असे राऊतांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “धमक्या देणाऱ्या मागची जी प्रेरणा आहे. धमक्या देणाऱ्याची तेवढी ताकत नाही. पण, त्यांच्या मागे ज्या काही शक्ती आहेत. ते अस्वस्थ आत्मे आहेत. त्यांना महाराष्ट्रात सत्तेत येता आले नाही. महाराष्ट्रातील लोकांनी त्यांना दूर केली आहे. त्यांचे जे वैफल्यग्रस्त आहे. ते दुसऱ्यांच्या माधमातून ते बाहेर काढत आहेत. याला शौर्य बोलत नाहीत. त्यांनी समोरू लढायला पाहिजे. पण, ते सुपाऱ्या देऊन ते आमच्याशी लढू पहात असतील. तर त्यांनी ते करत रहावे. तर त्याच त्यांचा वेळ जाणार आहे. सरकार सरकारचे काम करते, असे मला वाटते. 

अल्टिमेटम देणाऱ्यांनी अधी स्वता:चा पक्ष पहावा

सामनातून उपवस्त्रचा वापरला असा प्रश्नवर राऊत म्हणाले, “उपवस्त्राचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का?, केला असेल, तुम्ही त्याचा अर्थ समजून घ्या. माणसाना वापरण्यासाठी ठेवले जातात त्याला उपवस्त्र म्हणतात. सध्या महाराष्ट्रात असे वापर सुरू आहेत.  महाराष्ट्र, महाविकासआघाडी आणि शिवसेनेवर हल्ले करण्यात येत आहेत. त्यांची स्वत: हिमत नाहीत. असे बिन हिमतीचे लोक असे छोटे मोठे लोक पकडतात. आणि आमच्यावर हल्ले करायला लागतात. काही हरकत नाही, यासाठी आम्ही सगळ्याबाबतीत सक्षम आहोत. अरे कसला अल्टिमेटम काय होते, अल्टिमेटम देणाऱ्यांनी अधी स्वता:चा पक्ष पहावा. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे, म्हटल्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार संपूर्ण देशात जी भूमिका घेतली जाईल. ती महाराष्ट्रात घेतली जाईल. या राज्यात बेकायदेशीर असे कोणतेही कृत्य केले जाणार नाही. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ते संयमी आणि सक्षम असे नेते आहेत. या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तितकेच सक्षम आणि मजबूत नेते आहेत. या महाविकासआघाडीचे मार्गदर्शक शरद पवार हे सगळ्या अनुभवी नेते आणि प्रशासक आहेत. त्यामुळे या राज्यात कोणी अल्टिमेटम देऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल. तर तो त्यांचा भ्रम आहे. या राज्यामध्ये असे काहीही होऊ शकत नाही. कारण या राज्याची जनता सुज्ञ आहे.” 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“… तर फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा”, भाजप नेत्याच वक्तव्य!

News Desk

मार्चमधील अवकाळी पाऊस व गारपीट नुकसानीचे १ लाख ९९ हजार ४८६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

Aprna

एकही बालक पोषण आहारापासून वंचित राहणार नाही

News Desk