HW News Marathi
महाराष्ट्र

या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ? फडणवीसांचा सवाल !

मुंबई | नागरिकत्व सुधारणा विधेयकाला समर्थन देण्यासाठी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडीसरकारवर जोरदार हल्ला केला हे.भाजपच्या या मोर्चासाठी सरकारने परवानगी नाकारली आणि केवळ सभेसाठी परवानगी देण्यात आली. त्यामुळे भाजपचे नेते आक्रमक झाले.

या महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असा प्रश्न विचारत आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित करत CAA च्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र सरकावर निशाणा साधला. तुम्ही आम्हाला मोर्चा काढण्यापासून रोखू शकता, आम्हाला परवानग्या नाकारु शकता मात्र CAA चं समर्थन करण्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ऑगस्ट क्रांती मैदानात CAA च्या समर्थनार्थ सभा घेण्यात आली. त्याआधी रॅलीही काढण्यात आली. याच सभेत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ‘CAA के सन्मानमें मुंबईकर मैदानमें ‘ अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकासआघाडी सरकारने सत्तेसाठी फक्त मराठा समाजाचा वापर करून घेतला, विनायक मेटेंचा गंभीर आरोप 

News Desk

फेरीवाल्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या कल्पिता पिंपळेची राज ठाकरेंनी घेतली भेट!

News Desk

काँग्रेस पक्ष बिंडोक असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले

News Desk