HW News Marathi
महाराष्ट्र

देशात लोकशाही उरली आहे का? संजय राऊतांचा सवाल!


नवी दिल्ली। लखीमपूर हिंसाचार प्रकरणावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना गाडीखाली अक्षरश: चिरडलं गेलं. त्याचा एक व्हिडीओही अनेक नेत्यांनी ट्वीट केलाय. अशावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सकाळी सामना अग्रलेखातून मोदी सरकार आणि योगी सरकारवर टीका केली होती. पुन्हा आता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची संजय राऊत यांनी भेट घेतली. राजधानी दिल्लीत ही भेट झाली. यावेळी संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्यात जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना देशात लोकशाही शिल्लक राहिली आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय.

देशात लोकशाही उरली आहे का?

राहुल गांधी यांच्यासोबत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. प्रत्येक गोष्टी मी सांगू शकत नाही. काही गोष्टी आमच्या दोघांमध्ये राहू द्या, असं संजय राऊत म्हणाले. लखीमपूरला विरोधी पक्षांचं शिष्टमंडळ जाणार का? असा सवाल पत्रकारांनी संजय राऊतांना विचारला. त्यावेळी याबाबतही चर्चा झाली आहे. लवकरच तुम्हाला माहिती मिळेल, असं राऊत म्हणाले. देशात लोकशाही उरली आहे का? देशात जे काही सुरु आहे त्यावर आम्ही चर्चा केली. लोकशाही व्यवस्था पूर्णपणे ध्वस्त झाली आहे. राहुल गांधींसोबत राजकीय चर्चा झाली. आता विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं मतही संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केलंय.

काहीच वेळात कोर्टात दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाऊ शकते

सीतापूरमध्ये गेल्या 36 तासांपासून नजरकैदेत असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रियांका गांधींनी कलम -144 चे उल्लंघन आणि शांतता भंग केल्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे. आधी नजरकैदेत ठेवलेल्या प्रियांकांवर युपी पोलिसांनी 36 तासांनी कारवाई केली आहे.

प्रियांका गांधींना काहीच वेळात कोर्टात दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाऊ शकते. याआधी प्रियांका गांधींनी ट्विटरवर लखीमपूर हिंसाचाराशी संबंधित व्हिडिओ शेअर करुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारले. पोलिस हवं तेव्हा मला अटक करु शकतात पण मी शेतकरी कुटुंबांना भेटल्याशिवाय परतणार नाही, असा निश्चय बोलून दाखवत त्यांनी पोलिसांना आव्हान दिलं होतं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाधव पती – पत्नीला औरंगाबादमध्ये धक्का, दोघांच्याही पॅनेल्सना पराभवाची धूळ चाखावी लागली

News Desk

ज्ञानाचे कार्य करणाऱ्या रयत शिक्षण संस्थेने केली २ कोटी रुपयांची मदत

swarit

‘हा तर लोकांचा आणि लोकशाहीचा अपमान’ – नरेंद्र मोदी

News Desk