HW News Marathi
महाराष्ट्र

हसन मुश्रीफांवर अजून एक गंभीर आरोप!

कोल्हापूर। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या हे वारंवार आरोप करताना पहायला मिळतात. आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले. सोमय्या यांनी मुश्रीफांविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांच्यावर अजून एक गंभीर आरोप करण्यात आलाय. हा आरोप किरीट सोमय्या नाही तर ताराराणी आघाडीचे नेते आणि माजी महापौर सुनील कदम यांनी केलाय. महत्वाची बाब म्हणजे या प्रकरणात हसन मुश्रीफ यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी मदत केल्याचा आरोपही कदम यांनी केलाय.

अजून 33 गुंठे जमीनही आपल्याच नावावर करण्याचा साजिद मुश्रीफ यांचा प्रयत्न

हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांच्या मदतीने कोल्हापूर महानगरपालिकेची ड्रिम वर्ल्ड वॉटर पार्कमधील 15 गुंठे जमीन बेकायदेशीररित्या बळकावल्याचा आरोप सुनील कदम यांनी केला आहे. मुश्रीफ आणि पाटील यांनी राजकीय पदाचा गैरवावर करुन अधिकाऱ्यांवर दबाव आणत ही जमीन मुश्रीफ यांचे पुत्र साजिद मुश्रीफ यांच्या नावानं केली. त्यानंतर या जमिनीवर गृहनिर्माण प्रकल्प उभा केलाय. याच परिसरात अजून 33 गुंठे जमीनही आपल्याच नावावर करण्याचा साजिद मुश्रीफ यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही कदम यांनी केलाय.

सतेज पाटीलही अडचणीत येण्याची शक्यता

मुश्रीफ यांनी बळकावलेल्या जागांची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. जिल्ह्यातील या दोन्ही मंत्र्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचंही सुनील कदम यांनी सांगितलं आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्यासह आता सतेज पाटीलही अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिंगणघाट जळीत कांड : पीडितेच्या मृत्यूनंतर राज्यभरात तणावाचे वातावरण

swarit

मराठवाडा-विदर्भातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला

News Desk

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे ईडीला पत्र, चौकशीला गैरहजेरी

News Desk