HW News Marathi
महाराष्ट्र

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी चार नव्या आरोपींची छायाचित्रे जारी

पुणे | कोरेगाव भीमा हिंसाचार व हत्येप्रकरणी आता आणखी चार आरोपींची छायाचित्रे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने जारी केली आहेत. १ जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमामध्ये उफाळलेल्या हिंसाचारात राहुल फटांगडेचा मृत्यू झाला होता. या हत्येप्रकरणी अहमदनगरच्या श्रीगोंदा इथून ३ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता गुन्हे अन्वेषण विभागाने आणखी चार नव्या आरोपींची छायाचित्रे जारी केली आहेत.

विशेष म्हणजे यापूर्वी अटक करण्यात आलेल्या तिघांनीही राहुलची हत्या केल्याची कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला होता. तिन्ही आरोपी अहमदनगरचे आहेत. ११ जानेवारीपर्यंत या संपूर्ण प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या ५१ वर पोहोचली. १0 जानेवारी रोजी दिवसभराच्या कारवाईनंतर पोलिसांनी एकूण आठ जणांना अटक केली होती. त्यात राहुल फटांगडेच्या हत्येप्रकरणी तिघांना तर उर्वरित पाच जणांना सणसवाडीतल्या हिंसाचाराप्रकरणी अटक करण्यात आली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

उद्धव ठाकरेंविरोधात उत्तरप्रदेशमध्ये ऑनलाईन तक्रार दाखल!

News Desk

येत्या विधानसभेत सेना-भाजप स्वतंत्र लढतील यात शंकाच नाही !

News Desk

‘संजय राऊत म्हणजे आजचे आचार्य अत्रे’ भुजबळांकडून राऊतांचं कौतुक

News Desk
राजकारण

मोदी हत्येचा कट रचणा-यांचा निषेध | आठवले

News Desk

मुंबई | दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याकांडा प्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा धक्कादायक ई मेल पोलीस यंत्रणेला मिळाला आहे. याबाबतचे वृत्त कळताच असे षडयंत्र रचणाऱ्या हिंसक देशविघातक प्रवृत्तीचा तीव्र धिक्कार निषेध रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार देशाचा कारभार करीत असून सबका साथ सबका विकास हे सूत्र घेऊन ते संविधानातील भारत साकार करत आहेत. त्यांच्यावर कोणत्याही एका धर्माला ताकद देत असल्याचा आरोप चुकीचा असून त्यांच्याविरुद्ध आत्मघातकी हल्ला करण्याचे षडयंत्र रचणाऱ्या देशविघातक शक्तींचा आपण तीव्र निषेध करीत आहोत. अश्या खुनी हल्ल्यांच्या धमक्यांना प्रधानमंत्री बळी पडणार नाहीत. आत्मघातकी हल्ल्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना संपविण्याचे कारस्थान रचणाऱ्या शक्तींना जनता माफ करणार नाही असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

पुणे सत्र न्यायालयात सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना राजीव गांधी हत्याकांडासारखे आत्मघातकी हल्ल्यात संपविण्याचा कट असल्याचा ईमेल पोलिसांना मिळाला आहे अशी धक्कादायक माहिती दिली. ही माहिती मिळताच रामदास आठवले यांनी असा कट रचणाऱ्यांचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

Related posts

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर शरद पवार यांची पत्रकार परिषद; काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

Aprna

‘या’ कारणामुळे अनिल परब ED चौकशीला गैरहजर

Aprna

Shivsena Dasara Melava 2018 | २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार !

News Desk