HW News Marathi
महाराष्ट्र

जयंत पाटलांची ‘ती’ इच्छा पूर्ण होणं कठीण, शरद पवारांचं कुटुंब खूप मोठं !, मुनगंटीवारांचा टोला

मुंबई | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा आहे. सांगलीतील एका स्थानिक वहिनीला दिलेल्या मुलाखतीत जयंत पाटील यांनी “मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल” असे विधान केले आहे. याच पार्श्वभूमीवर, आता विरोधी पक्षाकडून देखील प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावर बोचरी प्रतिक्रिया दिली आहे. “इच्छा असणं गैर नाही पण राष्ट्रवादीमध्ये जयंत पाटलांना चान्स मिळणं कठीण आहे. कारण शरद पवारांचे कुटुंब फार मोठं आहे. मला वाटत नाही कि राष्ट्रवादीमध्ये जयंत पाटलांची इच्छा पूर्ण होऊ शकेल”, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

“जयंत पाटील यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं ?”, असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी सुधीर मुनगंटीवार यांना विचारला. यावर उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार यांनी बोचरी प्रतिक्रिया दिली आहे. “इच्छा असणं गैर नाही पण राष्ट्रवादीमध्ये जयंत पाटलांना चान्स मिळणं कठीण आहे. कारण शरद पवारांचे कुटुंब फार मोठं आहे. त्या कुटुंबाला संधी देता-देता जयंत पाटलांना साधारण १०० वर्षांपेक्षा जास्त आयुष्य ईश्वराकडे मागावे लागेल. आमच्या शुभेच्छाच आहेत. जयंत पाटील आमचे जवळचे मित्र आहे. त्यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा असेल तर आम्हाला आनंदच आहे. पण मला वाटत नाही कि राष्ट्रवादीमध्ये त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकेल.”

काय म्हणाले होते जयंत पाटील?

“आमच्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद सध्या नाही. प्रत्येक राजकारण्याला जशी इच्छा असते तशी माझीही मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. पण पक्ष आणि शरद पवार जो निर्णय घेईल तो आमच्यासाठी अंतिम असतो. त्यामुळे इतका काळ काम करणाऱ्या माझ्यासारख्या नेत्याला मुख्यमंत्री होण्याची इच्छा असू शकते. त्यामुळे माझी जबाबदारी माझी मतदारी आहे. यासाठी संख्या वाढली पाहिजे, पक्ष वाढला पाहिजे. ती संख्या जर वाढली आणि मोठा पक्ष झाला तर मग शरद पवार जो निर्णय देतील तो मान्य असेल”, असं जयंत पाटील यांनी या मुलाखतीतून स्पष्ट केलं आहे. पुढे त्यांना असंही विचारलं की अजित पवार, सुप्रिया सुळे यापैकी समर्थन कोणाला द्याल, त्यावर ते म्हणाले की, अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकच आहेत. पवारसाहेबांच्या घरातील त्या व्यक्ती आहेत त्या एकच आहेत त्यामुळे त्यांना वेगळं समजण हीच मुळात चुक आहे, असं पाटील म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी गृहमंत्र्यांच्या घरावरील छापेमारीवर आजी गृहमंत्र्यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

News Desk

गुप्तेश्वर पांडे वरिष्ठ अधिकारी होते मात्र भाजपचे नेते असल्यासारखे बोलत होते, गृहमंत्र्यांचा टोला

News Desk

एसटीच्या विलिनीकरणाबाबत गठित समितीच्या अहवालानंतर निर्णय घेणार! – अनिल परब

Aprna